गुरूकुल शिक्षण हे भारतातील अतिप्राचीन शिक्षण प्रकारातील एक आहे.
* शिक्षणाची पध्दत :
गुरूकुल शिक्षणाचा कालावधी ‘ कौटिल्य ‘ आधीचा आहे.या शिक्षण पध्दतीत विद्यार्थ्यांस शिक्षकांच्या घरी त्या कुटूंबाचा एक भाग बनून शिक्षण घ्यावे लागे.शिक्षकांस ‘ गुरू ‘ तर विद्यार्थ्यांस ‘ शिष्य ‘ हे संबोधन वापरले जात असे.वयाच्या ७ व्या किंवा ८व्या वर्षी गुरूकडे पाठविण्याचा प्रघात होता.हे शिक्षण १२ वर्षे चाले. या शिक्षण पध्दतीत अनेक विद्यांचा समावेश होता.
विद्याभ्यास, शस्राभ्यास, योगाभ्यास, अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाचा समावेश असे.
आश्रमात रहात असताना विद्यार्थ्यांना स्वतःची आश्रमाची आणि गुरूंची सर्व कामे करावी लागत असत. यामुळे ते कामसू आणि स्वावलंबी बनत असत.या ठिकाणी सर्व विद्यार्थी सोबत रहात त्यांच्यांत जातीपातीचा
, श्रीमंत -गरिबीचा कुठलाच भेद नसे.भारतात वैदिक काळापासून गुरूकुल अस्तित्वात होते.गुरू द्रोणाचार्य -अर्जुन, द्रोणाचार्य – एकलव्य,सांदिपनी- श्रीकृष्ण यांपासून ते निवृत्ती महाराज – ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत गुरू शिष्यांची फार मोठी परंपरा या देशाला लाभलेली आहे.ही एक निस्वार्थ शिक्षण पध्दती होती.गुरूकुल हे पूर्णपणे लोकांनी आणि राजाने दिलेल्या देणगीवर चालत असत.यात गुरू कुठलीच अपेक्षा न ठेवता शिष्यांना
ज्ञानदानाचे महान कार्य करायचे ते शिष्यांकडून कोणतीच दक्षिणा ही मागत नसतं.शिष्याला वाटले तर तो त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला जे द्यायचे असेल ते द्यायचा परंतु शिष्य गुरूंप्रती आजन्म कृतज्ञ मात्र असायचा.
या पध्दतीत विद्यार्थ्यांना, परिपूर्ण शिक्षण दिले जात.यात अनेक विद्या, मंत्रतंत्र,अस्र शस्र धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, योगशास्त्र, इत्यादी अनेक गोष्टींचे शिक्षण प्रशिक्षण दिले जात असे.शस्रांमध्ये त्यावेळी धनुष्यबाण,भाला,गदा, तलवार इत्यादी चालवण्याचे प्रशिक्षण येथे दिले जायचे तर योगशास्त्रात ध्यानधारणा,
योगासने,हटयोग,राजयोग,यांचे प्रशिक्षण दिले जात असे.परिपूर्ण शिक्षण देण्याचा उद्देश हाच की गुरूकुल मधून शिकून बाहेर पडलेला विद्यार्थी एक पूर्ण पुरुष असावा.त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अष्टपैलू विकास व्हावा.हे एक महान शिक्षण पध्दती होती.आजही बऱ्याच ठिकाणी गुरूकुल शिक्षण पध्दती होती.आजही बऱ्याच ठिकाणी गुरूकुल शिक्षण पध्दती होती.आजही बऱ्याच ठिकाणी गुरूकुल शिक्षण पध्दती दिसून येते.परंतु आजकाल काळाच्या ओघात तिच्यात बरेच बदल झाले आहेत.शिक्षणाचे विषय बरेच मर्यादित आहेत आणि प्रामुख्याने पुस्तकी ज्ञानावरच भर आहे.गुरूकुलाचे नियमही आधीसारखे कठोर राहिलेले नाहीत.
* गुरूकुल शिक्षण पध्दतीचे महत्त्व *
१) नियमांनी बांधलेले जीवन :- गुरूकुल शिक्षण पध्दतीचे जीवन हे नियमांनी बांधलेले असावे लागते.सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, रोज स्नान करणे, ध्यान – पूजा पाठ करणे , अभ्यास करणे या सर्व गोष्टी गुरूंच्या देखरेखीखाली कराव्याच लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना या नियमबद्ध जीवनाची सवय लागत असे .
२) स्वावलंबन :- शिष्यांना स्वतःची सर्व कामे स्वतःचं करावी .लागत असे त्यामुळे ते स्वावलंबी बनत.परावलंबी व्यक्ती स्वप्नातही सुखी होऊ शकत नाही.असे रामायणात म्हटले आहे.स्वावलंबन हा खरोखरच एक महान गुण आहे.महात्मा गांधीजी स्वावलंबनाला खूप महत्त्व द्यायचे.
३) कष्टाची सवय :- आश्रमात झाडलोट करणे, स्वयंपाकात मदत करणे , जंगलातून लाकडे आणणे
पाणी भरणे इत्यादी आश्रमात पडेल ते काम करण्याच्या सवयींमुळे मुले कामसू बनत.ते कष्टांना कधीही भीत नसतं. रोजच्या भरपूर कष्टांमुळे त्यांचे शरीर निरोगी आणि सुदृढ बनत.ते शरीर त्यांना आयुष्यभर आपल्या कर्तव्याच्या पालनात मदत करीत असे.
४) ब्रम्हचर्य पालन :- आश्रमात रहात असताना शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्व शिष्यांना ब्रम्हचर्य पालन
करावे लागत असे.ब्रम्हचर्य पालनांमुळे मुले चारित्र्यवान आणि संयमी बनत.अशाप्रकारे एका चारित्र्यसंपन्न समाजाची निर्मिती करण्याचे कामही गुरूकुल करीत असे.तर अशी ही ‘ गुरूकुल ‘ शिक्षण पध्दती सर्वांगाने सुंदर आणि महान होती.आज ती पूर्वीसारखी राहीली नाही.तरीही या पध्दतीचे काही फायदे आजच्या गुरूकुल पध्दतीत ही होतांना दिसून येतात.गुरूकुल मध्ये राहीलेली मुले थोड्याफार प्रमाणात तरी स्वावलंबन असतात.ती घरापासून दूर राहू शकतात.सकाळी लवकर उठणे, रोज स्नान करणे.इत्यादी सारख्या काही चांगल्या सवयी ही त्यांना लागतात.
* गुरूकुल कुठे आहेत *
भारतातील सर्वोत्कृष्ट वैदिक गुरूकुल शाळा ७० वर्षांहून अधिक अनुभवासह, श्री स्वामी नारायण गुरूकुल इंटरनॅशनल स्कूलने भारतातील सर्वोत्तम गुरूकुलांपैकी एक म्हणून एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे.१९४८ पासून स्वामीनारायण गुरूकुल विद्या,सद्विद्या आणि ब्रम्ह विद्येद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणत आहे.समाजात चांगले जीवन जगण्यास प्रोत्साहन देत आहे.या गुरूकुल शाळेच्या हैद्राबाद, बेंगळुरू, दिल्ली आणि अहमदाबाद येथे शाखा आहेत.
गुरूकुल तक्षशिला ही भारतातील सर्वोच्च गुरूकुलांपैकी एक आहे.आणि एक संस्था आहे.जी
केवळ ज्ञान देण्यापलीकडे दिसते.हे सर्वांगीण दृष्टिकोन अवलंबते मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित
करते, त्याला एक असे वातावरण देते जे मानवी जीवनासाठी सन्मान, शालीनता आणि आदर या मजबूत
मूल्यांचे पालनपोषण करते आणि ते विकसित करते.
* गुरूकुल पध्दतीचे महत्त्व आणि भारतीय शिक्षणाची गरज का आहे? *
( निखिल चंदवानी १० पुस्तकांचे लेखक )
प्राचीन काळापासून भारताने नेहमीच शिकण्याच्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रात समृध्द परंपरा असल्याचा अभिमान बाळगला आहे. हे सर्वज्ञात आहे की,युरोप, मध्यपूर्व आणि पोर्तुगाल सारख्या इतर राष्ट्रामधून लोक दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी भारतात आले.प्राचीन काळात भारतात प्रचलित असलेल्या प्रसिद्ध शैक्षणिक प्रणालींपैकी एक म्हणजे गुरूकुल प्रणाली
* सध्याच्या काळातील गुरूकुल पध्दतीचे महत्त्व. *
गुरूकुलांचे मुख्य लक्ष विद्यार्थ्यांना नैसर्गिक वातावरणात शिक्षण देणे हे होते.एकमेकांसोबत
बंधुता, माणुसकी,प्रेम आणि शिस्तीने जगले. अत्यावश्यक शिकवणी भाषा, विज्ञान, गणित यांसारख्या विषयांमध्ये गटचर्चा स्वशिक्षण इत्यादी इतकेच नाही तर कला, क्रीडा, हस्तकला,गायन यावरही भर देण्यात आला ज्यामुळे त्यांची बुध्दीमत्ता आणि समीक्षात्मक विचार विकसित झाला.योग, ध्यान,मंत्रजप इत्यादी
क्रियाकलांमुळे सकारात्मकता आणि मन:शांती निर्माण होते.आणि त्यांना तंदुरुस्त केले जाते.त्यांच्यामध्ये व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्याच्या हेतूने दैनंदिन कामे स्वतः करणे देखील बंधनकारक होते.या सर्वांमुळे व्यक्तिमत्त्व विकासात मदत झाली आणि आत्मविश्वास,शिस्तीची भावना, बुध्दी, आणि सजगता वाढली जी आजही समोरच्या जगाला तोंड देण्यासाठी आवश्यक आहे.
* सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी *
दुर्दैवाने गुरूकुल ही संकल्पना नाहीशी झाली आहे.लाॅर्ड मॅकाॅलीने १८३५ सांगली भारतात आणलेली आधुनिक शिक्षण व्यवस्था ही इतरांपेक्षा पुढे राहण्यासाठी उंदीर मारण्याच्या शर्यतीत आहे.
व्यक्तिमत्त्व विकास, नैतिक विवेकाची निर्मिती आणि नैतिक प्रशिक्षण यांचा पूर्ण अभाव आहे.या शिक्षणातील
सर्वात मोठी त्रुटी म्हणजे ती संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक व्यावसायिक स्वरूपाची आहे.ज्याने विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण दिले पाहिजे.हे शारीरिक क्रियाकलाप आणि इतर कौशल्य संचांच्या विकासासाठी खूप कमी वेळ देते.जे विद्यार्थ्यांला एक चांगला माणूस बनण्यास मदत करू शकतात.
* भारतात परत गुरूकुल पध्दतीची गरज आहे का? *
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने गुरूकुल शाळा ज्यामध्ये त्यांचा शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक विकास समाविष्ट आहे.गुरूकुलमध्ये विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये सांस्कृतिक ज्ञान आणि जीवन कौशल्यांशी संबंधित ज्ञान आणि संपूर्ण शिक्षण मिळाले त्यामुळे गुरूकुलांनी
संतुलित व्यक्ती निर्माण केल्या.
* गुरूकुल व्यवस्था कोणी नष्ट केली ? *
इंग्रजांच्या शिक्षण धोरणाचा उद्देश भारतात ” मानसिक गुलामगिरी ” प्रस्थापित करणे हे वसाहतवादी राजवट टिकवून ठेवण्याचे असल्याचे सांगून १८३५ मध्ये लाॅर्ड मॅकाॅले यांच्या शिफारशीनुसार ब्रिटिशांनी भारतातील ” गुरूकुल शिक्षण व्यवस्था नष्ट ” केली.
व्यापार आणि नफा कमावण्यासाठी ते भारतात आले असल्याने त्यांना देशाच्या शिक्षण व्यवस्थेची पर्वा नव्हती.तथापि त्यांनी भारतावर राज्य करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी प्राचीन गुरूकुल पध्दत रद्द केली.त्यांनी भारतीयांच्या एका छोट्या वर्गाला शिक्षित करण्यासाठी काही शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आणि त्यांना इंग्रजीची ओळख करून दिली.
I am not sure where youre getting your info but good topic I needs to spend some time learning much more or understanding more Thanks for magnificent info I was looking for this information for my mission.