* महाराष्ट्र नावाचा उगम *
‘ महाराष्ट्र ‘ हे नाव प्राकृत भाषेतील ‘ महाराष्ट्री ‘ या शब्दांवरून पडले.असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय.काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ “मर व रट्टा ” यांच्याशी लावतात.परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार ( महान वने -‘दंडकारण्य ) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे.त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही.महाराष्ट्र त्या काळात ‘ दंडकारण्य ‘ म्हणून ओळखले जात असे.
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये ‘ राष्ट्र ‘ या नावाने संबोधले गेले आहे.अशोकाच्या काळात राष्ट्रीक
आणि नंतर ” महा राष्ट्र ” या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदीवरून दिसून येते.चक्रधर स्वामींनी ” महन्त म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे ” अशी व्याख्या केली आहे.
* महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? *
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली.त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते.त्याचवेळी भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली.गुजराती भाषिकांनी स्वतःच वेगळं राज्य हवं होतं.त्याच वेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र: राज्याची मागणी करत होते.या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली.या आंदोलनाचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्या अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
१५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले.मात्र महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला.तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता.पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली.त्यानुसार १ हे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.हा दिवस मराठी माणसाचा तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांच स्मरण या दिवशी केलं जातं.
२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती.सकाळपासून फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं.राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता.या निर्णयाचा सर्वच स्तरांतून आणि अनेक लहानमोठ्या सभांमधून जळजळीत निषेध करण्यात येत होता.याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येणार होता.दुपारनंतर म्हणजेच मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापड गिरण्यांमधील कामगारांची चारची कामाची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चे निघाले.फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी करण्यात आली होती.कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं.पण,जमावबंदीला झुगारून मुंबईकर फ्लोरा फाऊंटनच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते.त्यांना उधळून लावण्यासाठी लाठीमारही करण्यात आला.पण तरीही ते चौकातून हटत नव्हते.अखेर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबाराचा आदेश देण्यात आला.मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे ‘ दिसताक्षणी गोळ्या ‘ घालण्याचे पोलिसांना आदेश होते.परिणामी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या रस्त्यावर उडू लागल्या.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी १९५७ पर्यंत जे १०६ आंदोलक हुतात्मे झाले.त्या मालिकेची ही सुरुवात होती.या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घेत १ हे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.दरवर्षी १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला.परंतु त्यांची पिळवणूकही होत होती.कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यात १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते.या विरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांची निर्मिती झाली.प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे,असा ठराव करण्यात आला.परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले.त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली.व १८९१ पासून १ हे हा कामगार दिन पाळण्यात येतो.
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला.याच दिवशी भारतात सर्वप्रथम लालबावटा वापरण्यात आला.