आपली प्राचीन खाद्यसंस्कृती

आहाराचा आणि शरीराचा, आहाराचा आणि मनाचा, आहाराचा आणि चित्तवृत्तीचा संबंध असतो.हे आपल्या पूर्वजांनी काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय.हे अध्दभूत आहे.त्या काळात प्रगत असलेल्या ग्रीक, इजिप्शियन किंवा चिनी संस्कृतीत असा उल्लेख दुरान्वयानंही आढळत नाही.दुर्देवानं आपल्या ह्या प्रगत आणि परिपूर्ण आहार प्रणालीची आपल्याला जाणीवच नाही.
‘ भगवतगीता ‘ हा ग्रंथ किमान साडेपाच ते सहा हजार वर्षे प्राचीन असावा.असा अंदाज आहे.अगदी पाश्चात्य विद्वानांच्या हवाल्यावरून बघितलं तरी ‘ गीता ‘ ही किमान अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी लिहील्या गेली आहे. हे निश्चित या गीतेतल्या १७ व्या अध्यायात ८,९, आणि १० हे तीन श्लोक आहेत, जे आहाराचा आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल भाष्य करतात. ” सात्त्विक,राजसी, आणि तामसी असे तीन प्रकारचे स्वभाव असलेल्या व्यक्तींमध्ये शरीर पोषण करण्यासाठी तीन प्रकारचे आहार घेण्याची प्रवृत्ती दिसून येते.आणि या तीन मानसिक वृत्तीना अनुसरून त्यांची कर्मे देखील तीन प्रकारची असतात.असे दिसून येते….!
एक परिपूर्ण वैज्ञानिक आणि प्राचीन खाद्य संस्कृती असलेला आपला देश हा जगाच्या पाठीवर एकमात्र आहे.अगदी ऋग्वेदापासूनच्या ग्रंथामध्ये आहार शास्त्राचे उल्लेख सापडतात.आपल्या शरीराचे पोषण करून त्याचा सत्कार करा.असे उल्लेख अनेक ठिकाणी आहेत.
जागतिक खाद्यसंस्कृतीत भारताच सर्वात मोठं योगदान कोणतं..? तर ते आहे मसाल्याचं आजपासून किमान दोन- तीन हजार वर्षांपूर्वी भारतातून मोठ्या प्रमाणात मसाले निर्यात व्हायचे.


काळी मिरी, दालचिनी,तमालपत्र,धने, इत्यादी मसाल्यांच्या पदार्थांचा शोध भारतीयांनी हजारो वर्ष आधीच लावला होता.नंतर ह्या मसाल्यांच्या मदतीने भारतात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे वेगवेगळे पदार्थ तयार झाले.हे पदार्थ अत्यंत चविष्ट होते.म्हणून काही हजार वर्षांपूर्वीच्या काळातही आपल्या ह्या भारतीय पदार्थांची भुरळ विदेशी यात्रेकरूंना पडली होती.मुळात ब्रिटिश असलेले ‘प्रोफेसर ‘ अंगस मेडिसन ‘ हे हाॅलंडच्या ग्रोनिंगेन विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी एक सुरेख ग्रंथ लिहीलाय,
‘ द वर्ल्ड एकाॅनोमी – ए .मिलेनियम पर्स्पेक्टीव ‘.अनेक विद्यापीठात हा ग्रंथ प्रमाण मानला जातो.
चिनी आणि इटालियन खाद्य संस्कृती प्रमाणेच, किंबहुना काही बाबतीत काकणभर जास्तच भारतीय खाद्य संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे.इटालियन पिझ्झा आणि पास्ता,डाॅमिनोज सारख्यांनी जगभर नेला.मात्र आपले दुर्दैव हे की इडली ,डोसा ,वडापाव,छोले-भटुरे पराठे , मिसळपाव,खमण ढोकळा, सारख्या पदार्थांना विश्वव्यापी बनवणाऱ्या उपहारगृहांच्या साखळ्या आपल्याला निर्माण करता आल्या नाहीत.
एका परिपूर्ण, वैज्ञानिक आणि पोषक अशा प्राचीन खाद्यसंस्कृतीचे आपण संवाहक आहोत.या संस्कृतीचा आपण अभिमान बाळगण्यात गैर काहीच नाही.उलट अशी ही समृद्ध खाद्य संस्कृती जगासमोर आणणे हे आवश्यक आहे.
*आहार कसा असावा? आहारशास्त्र*
तुम्ही खाता त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्त्व घडत. जसा माणसाचा आहार तसे त्याचे आचार विचार आणि आरोग्य तुमच्या आहारावर तुमची बुद्धिमत्ता,तुमचा स्वभाव,तुमची शारिरिक क्षमता, अवलंबून असते.शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त करणे या दोन्हीही गोष्टी आहाराच्याच अधीन आहेत.पथ्याने राहीले, योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी राहील आणि कितीही औषधे घेतली पण पथ्य केले नाही तर त्या औषधांचा उपयोग हवा तसा होणार नाही.
आपल्या थाळीत पोषक तत्वे असलेले घटक पोळी,भात,वरण,भाजी, कोशिंबीर,दही,व फळे हे सर्व घटक आहारात हवेत.ताटात उजवीकडे भाजी,वरण,हवे कारण उजव्या हाताने सहसा आपण जेवण करतो.या गोष्टीचं प्रमाण अधिक हवे.डावीकडे ताटात , लिंबू,हिरवी चटणी, कोशिंबीर हव्या.त्याचे प्रमाण थोडे कमी असते.ताटात या सर्व पदार्थाद्वारे नैसर्गिक रंग हजर हवेत.जसे – केशरी, पांढरा, हिरव्या रंगाच्या पालेभाज्या फळे, शेवटी दहीभात, कोशिंबीर,त्यात पण दही यामुळे सर्वच घटक आपसूकच मिळतात.
आपला आहार हा षडरसयुक्त असावा.गोड,तिखट,आंबट,खारट,कडू,तुरट रसांनी परिपूर्ण असावा.म्हणून कधी कवठाची चटणी,करवंदाची,आमसुलाची चटणी हवी.तुरट रस सर्वात महत्वाचा तो यकृताला बळकट करतो.पूर्वी लग्न कार्यात केळीच्या पानांवर किंवा पत्रावळीवर जेवायचे ही पाने विशिष्ट असतात.या पानांमध्ये ग्लुकोज टाॅलरन्स फॅक्टर असतो.जो मधुमेह रोखण्यात मदतनीस असू शकतो.तसेच जेवताना खाली मांडी घालून पाटावर बसून जेवण्याची पूर्वी पध्दत होती.यामुळे पोटाला घडी पडते.जेवणांवर नियंत्रण रहाते.पायाच्या पोटऱ्या दबल्यामुळे रक्तसंचय चांगला होतो.पंगतीत वाढणाऱ्याला ही वाकण्याचा,पोटाचा व्यायाम होतो.अन्न उगाच वायाही जात नाही.जेवतांना ताटाच्या सभोवार पाणी व चित्रावती टाकण्याची पद्धत -थोडासा चमचाभर भात आधी किडा मुंगी व इतर जीवाकरता तेही निसर्गचक्रात आहेत.याचे भान अन्नाच्या प्रत्येक घासासोबत आपल्याला मिळते.
भारतीय खाद्यपदार्थात तितकीच विविधता भरलेली आहे.जितकी धर्म, भूगोल, इतिहास,हवा, पाणी, आणि सभ्यता संस्कृती आहे. मसालेदार खाद्यपदार्थ नेहमी गरम असले पाहिजे असे नाही.भारतात अन्न शिजवणे ही एक कला असून ती अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून विकसित झाली आहे.भारतीय सण, उत्सव आणि कार्यक्रमातील जेवण हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.आपल्याकडे विशिष्ट प्रकारच्या जेवणाशिवाय सण उत्सव साजरा करण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.सण उत्सवाच्या काळात खाद्यपदार्थांची खास अशी तयारी केली जाते.
जेवताना हातांनी खाणे, निरोगी,व्यायाम करण्याव्यतिरिक्त,पचन उत्तेजीत करणे असे मानले जाते.फ्लोरा नावाचा एक अनुकूल जीवाणू आहे.जो आपल्या शरीराच्या काही भागात जसे की,हात, तोंड,आतडे म्हणून ओळखला जातो.जेव्हा आपण आपल्या हाताने जेवण करतो. खातो, तेव्हा हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात.आणि हानिकारक जीवाणूंच्या कोणत्याही प्रदर्शनापासून पाचनतंत्रांचे रक्षण करतात.तसेच असे मानले जाते की, आपल्या हातांनी खाल्ल्याने आपण जे खात आहात त्याबद्दल आपण अधिक जागरूक होतो.आपले मन आणि शरीर यांच्या मध्ये चांगले संबंध विकसित होतो.
* भारतीयांमध्ये खाणपानांत झालेला बदल?….खरचं योग्य आहे का? *
२० व्या शतकांपासून २१ व्या शतकापर्यंत जग प्रगत होत असताना आम्ही ” जागतिकीकरण”
नावाची एक प्रभावी सामाजिक क्रांती पाहीली यासह
निवडी,संधी,पैसा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि बरेच काही आले.त्याने थेट परकीय गुंतवणूकीचे दरवाजे उघडले.ज्यामुळे भारतातील सर्व महानगरांमध्ये
” आयटी” (माहीती तंत्रज्ञान) उद्योगांसाठी मार्ग मोकळा झाला.यामुळे उत्तम रोजगार,शिक्षण, आंतरराष्ट्रीय वस्तूंपर्यत सुलभ प्रवेश विविध देशांतील
लोकांमध्ये वाढलेला संवाद आणि इतर अनेक फायदे
झाले.तेव्हापासूनच भारतीयांमध्ये पाश्चात्य संस्कृतीचा
जोरदार प्रभाव आहे.मग यामध्ये अन्न असो, जीवनशैली असो, किंवा जगण्याची वृत्ती असो त्याचा
मोठा प्रभाव निर्माण झाला.
पाश्चात्य देशांचा प्रभाव तसेच आधुनिकीकरणाच्या
नावाच्या आगमनाने खाद्यपदार्थांची जागा बाजारपेठेत स्नॅक्सने घेतली आहे.ज्यांना आज आपण ” जंकफूड”
म्हणतात.बर्गर, पिझ्झा,,एरेटेड, ड्रिंक्स,घेण्याची संस्कृती स्वदेशी पदार्थांपेक्षा प्राधान्य दिले जात आहे.
पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीविषयी तक्रार नाही.पण विषय
हा आहे की आम्ही इतरांची आंधळेपणानी काॅपी करतो.पाश्चीमात्य कपडे, आणि खाण्याच्या सवयी त्यांच्या पर्यावरण आणि रहाणीमानास अनुरूप बनवल्या गेल्या आहेत.आमच्यासाठी नाहीत.
आपली खाद्यसंस्कृती तब्बल पाच हजार वर्षे जुनी आहे.पण हे सिध्द करण्यासाठी आपल्याकडे कुठलेच लिखित पुरावे उपलब्ध नाहीत.खरं तर युरोपमध्ये खाद्य इतिहासाच्या अभ्यासाला सुरू होण्याआधी भारतात १९४० च्या दशकात त्याला सुरूवात झाली.मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.
भारतात २८ राज्ये ८ युनियन केंद्रशासित प्रदेश आहेत
प्रत्येकाची खाद्यसंस्कृती वेगळी आहे.
पाश्चिमात्य जगात काय खाल्ले जात आहे, हे पाहून आपण आपला पारंपारिक आहार विसरतोय.
‘ जागतिक अन्न दिवस ( वर्ल्ड फूड डे) पासून आपण घरगुती खाद्यपदार्थातच खरी संस्कृती आहे. म्हणून आपण आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीला संपूर्ण जगभर मानाचं स्थान देऊ या.
आपल्याकडे ‘ अन्न हे पूर्ण ब्रह्म!’ असे म्हटले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top