नवरात्रोत्सव आणि घटस्थापना

* घटस्थापना म्हणजे काय ?

घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय.आपल्या शेतात जी पीकं पिकवली जातात.
ज्यातून आपलं पोट भरत त्या श्रध्दा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते,घरी नवीन धान्य आलेलं असतं.घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील
माती आणली जाते.त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जात.दसऱ्यापर्यत ते पीकं त्या घटासमोर उगवत.या नऊ दिवसांत आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांची ही पूजा केली जाते.कलश हे गणेशाचे रूप आहे.देवतांची गणेशाच्या रूपात पूजा केली जाते.म्हणूनच नवरात्रीमध्ये घटस्थापनेला म्हणजेच कलशाच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे.

* नवरात्री उत्सव का साजरा केला जातो?

शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी शरदत ऋतूमध्ये अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून
सुरू होतो.नवरात्रीचे विशेष महत्व आहे.नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा करतात.आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात.
हिंदू धर्मात वर्षातून चार वेळा नवरात्री येते.परंतु चैत्र शारदीय नवरात्रीला विशेष महत्व आहे.हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्री पासून मानली जाते.त्याचबरोबर शारदीय नवरात्रीचेही वेगळे महत्त्व आहे.असे म्हटले जाते की, शारदीय नवरात्री धर्मावर,अनीतीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवी पृथ्वीवर येते.आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते.
देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

* नवरात्रीची आख्यायिका :

१) नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या दोन पौराणिक कथा आहेत.पहिल्या कथेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले.आणि वरदान मागितले की,विश्वातील कोणताही देव,राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकत नाही.हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूराने दहशत निर्माण करायला सुरूवात केली त्याने दहशत निर्माण करायला सुरूवात केली.त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गादेवी शक्तीच्या रूपात
जन्माला आली.दुर्गादेवी आणि महिषासुर यांच्यातील युध्द नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने
महिषासूराचा वध केला.
२) दुसऱ्या एका कथेनुसार जेव्हा भगवान श्रीराम लंकेवर हल्ला करणार होते.त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली.रामाने रामेश्वर मध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्रीरामाला विजयाचा आशीर्वाद दिला.त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा साजरा केला जातो.
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,,उमेद ,
निर्माण होत असते.बृहतसंहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचा खेळ आहे.ब्रम्हचर्य, संयम, उपासना,यज्ञ केल्याने शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते.स्मरणशक्ती चांगली होऊन बौध्दिक विकास होतो.म्हणून नवरात्र हा शारिरीक व आत्मिक शुध्दतेचा काल आहे असे मानले जाते.सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले.आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया, किंवा जगदंबा म्हणून गौरविले देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे
पाहायला मिळतात.उमा, पार्वती, जगदंबा, भवानी,ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा,काळी,चंडी,
भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
चार नवरात्री प्रामुख्याने मानल्या जातात.सर्व नवरात्रीत देवी प्रमुख देवता असते.

१} शारदीय नवरात्र
२} दुर्गा पूजा
३} वासंतिक नवरात्र
४} गुप्त नवरात्र अथवा वराही नवरात्र
५} चंपाषष्ठीचे नवरात्र
६} नरसिंहाचे नवरात्र

* घटस्थापना पुढीलप्रमाणे करतात:
दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात.परडीत काळी माती घालतात.त्यात एक सुगड ठेवतात.त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात.त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात.त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात.त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात.हार,वेणी,गजरा घालतात.घटाखालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात.ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात.त्या दिव्याची काळजी घेतली जाते.दीप म्हणजे प्रकाश अन् प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात.सकाळ- संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते.उपासना केली जाते.नवरात्रीतील ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात.कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते.रात्री मन शांत स्थिर असते.त्याची एकाग्रता तादात्म्यभाव लवकर साधतो.एक एक दिवसाने घटाखालच्या मातीत पेरलेले धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते हळूहळू वाढू लागते.तेच त्या देवीचे घटावरचे दर्शन असते.

Image by Freepik

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top