प्राचीन शास्रज्ञ

१) आर्यभट्ट गणितज्ज्ञ
२) महर्षि चरक
३) वराहमिहीर
४ कणाद
५) सुश्रुत
६) वाग्भट
७) भास्कराचार्य ( द्वितीय )

आर्यभट्ट ( गणितज्ज्ञ )


जन्म – इ.स.४७६. मृत्यू – इ.स. ५५०
उल्लेखनीय कार्य – जगाला दिलेली शून्याची देणगी
शून्य ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी अमूल्य देणगी आहे.असे आपण म्हणतो.पण याच शून्याचा शोध कुणी लावला हा प्रश्न जर आपणास विचारला.तर लगेच उत्तर येते आर्यभट्ट! याच आर्यभट्टाचा जन्म शके ३९८ म्हणजेच इ.स.४७६ मध्ये बिहारमधील पाटलीपुत्र येथे झाला.हा सामान्य आर्यभट्ट आपल्या असामान्य कर्तृत्वाने इतिहासात अजरामर झाला.आर्यभट्टांचे बालपण तसेच उर्वरित आयुष्य पाटलीपुत्र मध्येच गेले.त्यांनी लिहीलेल्या खगोलशास्त्रीय ग्रंथात प्रथम ‘ आर्यभट्टीय ‘ किंवा आर्यसिध्दांत हा सर्वात प्राचीन ग्रंथ प्राचीन ग्रंथ आहे.या ग्रथांस आर्यभट्टीय हे नाव स्वतः आर्यभट्टांनीच दिले आहे.त्यास, त्यांचे शिष्य
आर्यसिध्दांत असे म्हणत असत.याच आर्यभट्टीय ग्रंथात दशगीतिका व आर्यष्ठशत असे दोन भाग आहेत.काही तज्ज्ञांच्या मते हे दोन भाग आहेत.काही तज्ज्ञांच्या मते हे दोन भाग नाहीत.तर ते दोन वेगवेगळे भाग आहेत.
या दोन्हीही ग्रंथ हे एकमेकांवर अवलंबून असल्याने यास एकच ग्रंथ मानतात येईल.त्यास पद असून फक्त एकशे एकवीस श्लोक आहेत.
आर्यभट्ट यांच्या दशगीतिका भागातील तेरा श्लोकांपैकी दहा श्लोकात हे ग्रहभगणासंबंधी विवेचन केले आहे.( भगण म्हणजे ग्रहांची नक्षत्र मंडळातून एक प्रदक्षिणा ) तर इतर तीन श्लोक हे प्रार्थनेवर आधारित आहेत.त्यांनी लिहीलेले चार पदे – १) गीतिकापाद २ ) गणितपाद ३ ) कालक्रियापद ४ ) गोलपाद
त्याच्या सोबतच बीजगणित,भूमिती, अंकगणित या गणिती शाखांचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता.
त्यांनी बीजगणित व ज्योतिषशास्त्रावर वयाच्या तेविसाव्या वर्षी ग्रंथ लिहिला.त्यामुळे त्यांना बीजगणिताचे जनक असेही म्हणतात.पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते.म्हणजेच तिला स्वतःची दैनंदिन गती आहे.हे सांगणारे आर्यभट्ट हे पहिले शास्त्रज्ञ होते. आर्यभट्ट ने वर्षातील ३६५ दिवस,१५ घंटी,३९पळे,व१५ विपळे इतक्या सूक्ष्म भागापर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे.त्यांनी पाय नावाच्या संकल्पनेची ६३,८३२/२०००० आहे.असेही नोंदवले आहे.त्याने सूर्य सिद्धांतावर लिहीलेल्या टीका ग्रंथ सूर्य सिध्दांत प्रकाश या नावाने प्रसिद्ध आहे.आर्यभट्ट यांनी खगोलीय निरीक्षणात ११ ऑगस्ट इ.स.५१९ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल त्यांना समाजाच्या रोषास सामोरे जावे लागले होते.त्यांना समाजाने बहिष्कृत केले होते.पण शेवटी त्यांनी सिद्ध केले की अंधश्रद्धेच्या पगड्यातून बाहेर पडून जगाचा,ग्रहांचा,ताऱ्यांचे निरीक्षण करायला हवं.आज त्यांच्या मुळेच कितीही मोठी आकडेमोड क्षणांत होते.त्यामुळे त्यांना He is good mathematician असे
गौरवलं गेलं.त्यांचा मृत्यू इ.स.५५० मध्ये झाला.
भारत सरकारने त्यांच्या गौरवार्थ १९ एप्रिल १९७५ मध्ये आर्यभट्ट नावाचा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला.


* महर्षी चरक *चरक ( जन्म इ.स.पू.३०० ) हे एक आयुर्वेदावरील प्रमुख योगदान कर्ते होते.भारतात पूर्वी त्यांचे नाव गाजत होते.त्यांचा उल्लेख कधी कधी शरीरशास्राचे पितामह म्हणून होतो.
‘ चरक ‘ हे अभिधान ‘ फिरस्ते विद्यार्थी ‘ किंवा ‘ फिरस्ते वैद्य ‘ यांना लागू होते. चरकाच्या मते
आरोग्य व रोग हे पूर्वनिर्धारीत नसतात.आयुष्य हे मानवी प्रयत्नांनी, विशिष्ट दिनचर्येने व ऋतूचर्येने वाढविले जाऊ शकते.भारतीय परंपरेनुसार व आयुर्वेद प्रणाली नुसार ‘ रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा, तो होऊच न देणे कधीही श्रेयस्कर ‘ असे ठरविण्यात आले आहे.यात दिनचर्या बदलविणे व निसर्गाशी व चारही ऋतूंशी ती जुळविणे हे महत्त्वाचे मानले आहे.याने आरोग्य राखले जाते.
चरक मुनींनी चरक संहितेत दिलेली व दुर्लक्षित होत गेलेली ही विधाने आज अनिवार्य म्हणून समोर येत आहेत.या संहितेत अशी अनेक विधाने की जी आजही आदरास पात्र आहेत.त्यातील काही विधाने शरीरशास्र, अभर्कशास्र इत्यादी क्षेत्रातील आहेत.
चरक हा पचन, पचनसंस्था,व प्रतिकारशक्ती हे विचार प्रस्तुत करणारा प्रथम वैद्य होता.
शरीराची क्रिया ही मुख्यत्वेकरुन तीन दोषांवर अवलंबून असते.वात,पित्त,व कफ खाल्लेल्या अन्नावर धातूंची क्रिया झाल्याने ( रक्त,चामडी,व अस्थिमज्जा ) उत्पन्न होतात.
सारख्याच प्रमाणात सारख्याच प्रकारचे अन्न खाल्ले तरी इतर शरीराच्या मानाने, एखाद्या शरीरात दोष होतात.म्हणूनच प्रत्येक शरीर हे दुसऱ्या शरीरापेक्षा वेगळे असते.ते कमी अधिक वजनी,सुदृढ वा
ऊर्जामय असू शकते.
चरकांनी संपूर्ण शरीरशास्राचा व मानवी अवयवांचा अभ्यास केला.त्यांनी शरीरात दातांसह हाडांची संख्या ही ३६० सांगितली.ह्रद्य म्हणजे एक पोकळी असते.असे त्यांचे चुकीचे अनुमान होते.पण त्यांनी ह्रदयास नियंत्रण केंद्र मानले.ते सर्वथा बरोबर होते.त्यांनी प्रतिपादन केले की, ह्रदय हे १३ मुख्य वाहिन्याद्वारे संपूर्ण शरीराशी जोडले आहे.या व्यतिरिक्त तेथे न मोजता येण्याजोग्या वेगवेगळ्या आकाराच्या नसा आहेत.त्या उतीला अन्नरस पुरवितात व टाकाऊ पदार्थ बाहेर जाण्यास जागा करून देतात.त्यांनी असेही
नमूद केले की या प्रमुख वाहिन्यांस ( नसांना) कोणताही अडथळा आल्यास तो शरीरात रोगोत्पती वा व्यंग निर्माण करतो.
अरबी व लॅटिन यांसह अन्य विदेशी भाषांमध्ये चरकसंहितेचे भाषांतर झाले आहे.

* वराहमिहीर *वराहमिहीर ( सन ४८७ ते ५५० ) हे विचारवंत पर्यावरणतज्ज्ञ व निष्णात ज्योतिषी
उज्जैनच्या ( मध्यप्रदेश) परिसरात होऊन गेले.त्यांचा ‘ बृहत् संहिता ‘ हा अतिप्रसिध्द असलेला ग्रंथ त्यातील गर्भलक्षणाध्याय, गर्भधारणाध्याय,प्रवर्षणाध्याय आणि दकर्गलाध्याय असे चार अध्याय ‘ पाणी ‘ ह्या विषयासंबंधी विस्तृत माहिती देतात.दकर्गल ( उदक + अर्गल ) म्हणजे अडथळ्यांमागील पाणी म्हणजेच भूगर्भातील पाणी किंवा भूर्भजल!
वराहमिहीरांनी भूर्भजल शोधतांना मुख्यतः तीन गोष्टींच्या निरीक्षणांवर भर दिला.त्यात उपलब्ध वृक्ष,वृक्षांजवळील वारूळे,त्या वारूळाची दिशा,त्यात राहणारे प्राणी आणि तेथील जमीन तिचा पोत
रंग,पोत, आणि चव!
वराहमिहीर हे मुख्यत्वे ज्योतिषी होते.तसेच ते ‘ खगोलशास्त्रज्ञ ही ‘ होते.त्यांनी आकाश निरीक्षणासाठी आयुष्याचा बराच काळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवला.त्या विषयावर ग्रंथ लिहिले.
बृहत् संहिता हा त्यांचा शेवटचा ग्रंथ! तो त्यांचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ; तसेच प्राचीन भारतीय विद्याभ्यासाचा संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता प्राप्त आहे.
वराहमिहीरांनी सुमारे पंचावन्न वृक्ष व वनस्पती यांचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्यांतील काही वृक्ष – जांभूळ, आंबा,वड, पिंपळ,कदंब,शमी,शिरीष,पळस,बेल, औदुंबर,नारळ,दाऊहळद
बिब्बा,धर्म,बेहडा,करंज, कांचन, जेष्ठमध,कवठ,दुर्वा, इत्यादी! अशा वृक्षांजवळील वारूळात बेडूक,मासा
साप,पाल,घोरपडे,सरडा, मुंगूस,नाग,कासव इत्यादी प्राण्यांचा वास असतो.असे उल्लेख आढळतात.त्यांतील बेडूक हा उभयचर म्हणजे पाणी व जमीन दोन्हीकडे राहणारा! तो उन्हाळ्याचे चार महिने भूगर्भात झोपतो.
त्याची बिळे ही दोन- अडीच मीटर एवढी खोल आढळली आहेत.तर जेथे पाणी आहे.तेथे माशांसारखे जलचर प्राणीही सापडतात.त्या सगळ्यांची बिळे- वारूळे यांच्या अभ्यासात वराहमिहीर यांचे स्थान अव्वल
मानले जाते.
माती किंवा भूर्भजलातील पाणी हा त्याच्या निरीक्षणाचा तिसरा महत्त्वाचा भाग! मातीचे वेगवेगळे थर स्थलपरत्वे तसेच वेगवेगळ्या खोलीवर आढळतात.वराहमिहीर यांनी मातीचे वर्गीकरण पुढील
पध्दतीने केले आहे.काळी माती, भुरकट माती, पिवळी माती ,पांढरी माती,लाल माती,वाळू मिश्रीत माती, लोहयुक्त माती,निळसर माती, पिवळसर काळी माती, लालसर माती, पांढरट माती, क्षारयुक्त माती, वाळू,
ओसाड म्हणजे गवताचे पानेही न उगवणारी माती ! ते खडकांचे वेगळे निरीक्षण मांडतात.काळा पाषाण, हिरवट छटा असलेला पाषाण,निळसर काळा पाषाण,करडा- मातकट रंगाचा दगड,चटकन पीठ होईल असा
ठिसूळ दगड,थरांचा दगड,तेलकट- मेणचट पाषाण इत्यादी!
प्राणी,वृक्ष आणि माती व खडक यांच्या निरीक्षणातून पाणी शोधायचे! त्यांचे वर्गीकरण वराहमिहीर करतात.ती निरीक्षणे खोदलेल्या,उथळ विहीरीबद्दलची आहेत.अर्ध पुरूष म्हणजे एक मीटर ते द्वादश पुरूष म्हणजे चोवीस मीटर एवढ्या खोलापर्यतची त्याखालील पाण्याचेही उल्लेख आहेत.पण ते तुरळकच त्यांनी गोड पाणी,मधुर पाणी, क्षारयुक्त पाणी,खारट पाणी असे पाण्याचे वर्गीकरण केले आहे.
त्यांनी उपलब्ध पाणी तीन गटांत विभागलेले आहे.१) भूगर्भाच्या आतून वाहणारे पाणी, २) ठराविक प्रकारची
रचना असलेल्या भूगर्भात आढळणारे स्थिर पाणी आणि ३) वरील दोन्ही प्रकारांत न मोडणारे भूगर्भातील पाणी. त्यांनी ‘ पाण्या ‘ चार आढळ वेगवेगळ्या निरीक्षणांमधून करून अडतीस श्लोकांमध्ये मांडून ठेवला आहे.

* वराहमिहीर पुढील निरीक्षणे नोंदवून ठेवतात *
१ )भरपूर फांद्या व तेलकट साल असलेला ठेंगणे झाड असेल तर तेथे पाणी आढळते.
२) उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर त्या पृष्ठभागाजवळ पाणी असते.
३) झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.
४) काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर पाणी तेथे हमखास मिळते.
५) जमीन जेव्हा गरम झालेली असते आणि ती तेव्हा एखाद्याच ठिकाणी थंड लागली तर तेथे पाणी असते.
६) जमीन उन्हाने तापून गर्दभवर्णाची झाली असेल तर तेथे खडकाच्या खाली पाणी आढळते.
७) जेथे झाडे विरळ असतात तेथे पाणी खूप खोल आढळते.
८) जमीन / खडक तेलकट अथवा मेणचट असेल तर तेथे स्थिर पाणी आढळते.
वराहमिहीरांचा अभ्यासाचा पडताळा प्रत्यक्ष पाहावा म्हणून आंध्रप्रदेशातील तिरूपती विद्यापीठाने विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी प्रत्यक्ष विहीरी खोदून पाहण्याचे ठरवले. वराहमिहीराच्या निरीक्षणानुसार योग्य ठरतील अशा जागा निवडल्या सुमारे तीनशे विहीरी खोदल्या.त्यात त्याचे निरीक्षण पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा ही जास्त ठिकाणी योग्य असल्याचे आढळून आले.
( जोपासना दिवाळी २०१७ अंकावरून उद्धृत, संपादित – संस्कारित )

* कणाद *


कणाद हे इसवीसन पूर्व सहाव्या शतकातील एक ऋषी होते.धान्याचे पण गोळा करून अत्यंत साधे जीवन जगणारे होते.त्यामुळे त्यांचे नाव ‘ कणाद ‘ असे पडले.त्यांनी ‘ वैशेषिक सूत्र ‘ या संस्कृत ग्रंथात अणूविषयक व पदार्थ विषयक चर्चा केलेली आहे.
कणाद हे प्राचीन भारतीय तत्वज्ञ होते.त्यांनी जगात सर्वप्रथम अणुसिध्दांत मांडला.या सिद्धांतानुसार जगातील सर्व पदार्थ हे अणूंचे बनलेले असतात.ही संकल्पना त्यांनी आपल्या वैशेषिक सूत्र या ग्रंथात मांडली.
वैशेषिक दर्शन हे सहा आस्तिक दर्शनांपैकी एक आहे. ते ईश्वराला मानत नाहीत.म्हणजेच निरीश्वरवाद मानतात.वैशेषिकशास्राचा कर्ता कणाद ऋषी आहे.
जगत् हे परमाणू आरंभिक संयोग वियोगजन्य आकृति विशेष असल्याचे कणाद यांचे मत आहे.
वैशेषिक दर्शनाचा आद्यप्रर्वतक ह्यांच्या दर्शनाला ‘ औलूक्य दर्शन ‘ असेही म्हणतात. उलुकाचे किंवा औलूक्याचे तत्वज्ञान ‘ असा त्याचा अर्थ ‘ उलूक ‘ हे अभावाचे किंवा त्यांच्या पित्याचे नाव असावे.त्यांचे गोत्र काश्यप माहेश्वर योगसंप्रदायातील हा अतिप्राचीन आचार्य होय.याने योगजन्य अलौकिक प्रत्यक्ष योग्याला होत असते.असे आपल्या वैशेषिक सूत्रांमध्ये म्हटले आहे.त्यावरून हा शैव योगसंप्रदायाचा
आचार्य होत.असे सिध्द होते.माहेश्वर योगसंप्रदाय हा शैव संप्रदायच होय. उलूक नामक जमात गंधार देशात होती.असे इतिहास तज्ञ म्हणतात.त्यातील ही व्यक्ती असणे शक्य आहे.कणाद हे त्यांचे नाव,त्याने शेतात पडलेले धान्याचे कण वेचून त्यावर उपजीविका करण्याचे व्रत आचरले.म्हणून त्याला प्राप्त झाले असे न्यायकंदली ह्या वैशेषिक दर्शानाच्या प्रशस्तपादकृत भाष्यावरील श्रीधरभट्टाच्या टीकेत म्हटले आहे.मनुस्मृतीत या प्रकारच्या व्रतास ‘ उंछवृत्ती ‘ म्हटले आहे. न्यायकंदलीत तास ‘ कापोतीवृत्ती ‘ अशी संज्ञा दिली आहे.कबुतराप्रमाणे दाणे वेचून उदरनिर्वाह करणे असा त्याचा अर्थ हा कणावादाचा,म्हणजे अणूवादाचा पहिला भारतीय तत्वज्ञ होय.पृथ्वी,जल,तेज,व वायू यांच्या अविभाज्य अशा सूक्ष्मांशांच्या म्हणजे अणूंच्या समुदायाने दृश्य विश्व बनले आहे. असा त्यांचा मूळ सिध्दांत होय.
बौध्द दर्शनावर कणादाच्या अणूवादाचा प्रभाव दिसतो.कारण बाह्यार्थवादी हीनयानी बौध्द दर्शनात सर्व दृश्य पदार्थांचे सत्य स्वरूप अणूमय आहे.असा सिध्दांत प्रतिपादिला आहे.

* सुश्रुत *


प्राचीन भारतीय आयुर्वेदाचार्य आणि शल्यतंत्रपारंगत ते भारतीय शल्यतंत्राचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांचा काल व चरित्रात्मक तपशील निश्चितपणे सांगता येत नाही.तथापि भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील एन.एल.केसवानी ह्यांच्या मते, सुश्रुताच्या काळाची पूर्वमर्यादा इ.स.पू.६०० ही होय.सुश्रुत हे दिवोदास काशीराज या धन्वंतरीचे शिष्य होते.असा उल्लेख हे माद्रिकृत लक्ष्मण प्रकाशातील एका श्लोकात आला आहे. युरोप, अरबस्तान,ग्रीस, कंबोडिया, आणि इंडोचायना येथे नवव्या व दहाव्या शतकात सुश्रुतांचे नाव माहीत झाले होते.अरबस्तानातील वैद्य राझी ( इ.स.पू.पहिले शतक ) यांनी सुश्रुतांच्या ग्रंथातून शल्यक्रियेचे तंत्र माहीत झाल्याचा उल्लेख त्यांच्या ग्रंथात केला आहे.
सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पध्दती आणि शस्त्र क्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक मर्यादांचे वर्णन केले आहे.या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागांत वर्गीकरण केले गेले आहे.छेदन,भेदन, लेखन,आहरण,व्याधन,झसण,स्रवण,शिवण,या त्या आठ क्रिया होत.
गंगा नदीच्या काठी जिथे आजचे वाराणसी शहर वसले आहे.त्याच परिसरात सुश्रुतांनी आपल्या विद्येचा अभ्यास तसेच प्रसार केला.शल्यक्रियेमधील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे सुश्रुत शल्यक्रियेचे पितामह म्हणून ओळखले जातात.
विविध प्रकारचे गोळे ( ट्युमर ) शरीरांतर्गत झालेली किंवा बाहेरून झालेल्या इजा, अस्थिभंग व गर्भारपण / बाळंतपणातील त्रास व त्यांच्यासाठीची शल्यक्रिया,आतड्यांची शल्यक्रिया आदी शल्यक्रिया सुश्रुतांनी विकसित केल्या.त्यांना काॅस्मेटिक सर्जरीचे जनक समजल्या जाते.
जेव्हा औषोधोपचाराने थोडी ठिक होतं नाही.तेव्हा काही रोगात शल्यक्रिया आवश्यक असते असे त्यांचे म्हणणे होते.अर्बुद , गंडमाला, मूळव्याध,मूत्राश्मरी,गुदभ्रंश, स्तनरोग आली व्याधीमध्ये कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांचे वर्णन त्यांनी त्यांच्या सुश्रुत संहिता या ग्रंथात केले आहे.शस्रक्रियांचे वर्णन त्यांनी त्यांच्या सुश्रुत संहिता या ग्रंथात केले आहे.शस्रक्रियेआधी काय तयारी करावयास हवी,इतर प्रक्रिया,
शरीरातील मर्मे सुंगणी शस्त्रक्रियेनंतर करावयाचे उपचार यांची पण माहिती या ग्रंथात आहे.ते शस्त्रक्रियेनंतर जखम शिवण्यास रेशीम गुळवेल किंवा अस्मांतक वृक्षाचा धागा वापरत त्यांनी हजारो वर्षाआधी शल्यक्रियेचा पाया घातला.
सुश्रुत संहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे.परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान
त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले.
आयुर्वेदानुसार शरीरात तीन दोष आहेत.त्यांना वात, पित्त,व कफ अशा संज्ञा आहेत.
सुश्रुताचार्यांनी ‘ रक्त ‘ हा चौथा दोष मानला आहे.त्यांनी दोषांच्या संचय-प्रकोपादि- गतीनुसार विचार करून चिकित्सा करावी असे सांगितले आहे. या चिकित्सा करण्याच्या कालावधीस त्यांनी ‘ क्रियाकाल ‘ अशी संज्ञा दिली आहे.वातज, पित्तज व कफज असे तीन प्रकारचे जिव्हाकंटक असून त्याशिवाय सुश्रुताचार्यांनी कलस व उपजिव्हा असे रोग समाविष्ट करून पाच जिव्हारोगांचे वर्णन केले आहे.

* वाग्भट *

वाग्भट हे आयुर्वेदावर अष्टांगसंग्रह आणि अष्टांग संहिता हे ग्रंथ रचणारे एक महर्षी होऊन गेले.
वाग्भटांनी आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो आजार होऊच नये.यावर जास्त भर दिला.म्हणजे त्यांनी आजारांवर चिकित्सा केली अथवा सांगितली नाही असे नाही, परंतु त्यांचा मुख्य भर हा आयुष्यभर निरोगी असे रहावे याकडेच होता.
प्राचीन भारतातील वैद्य, या नावाचे दोन वैद्य होऊन गेल्याचे मानतात.आजोबाचे नाव नातवाला देण्याच्या त्या काळातील प्रथेनुसार हे दोघे आजोबा व नातू असावेत. त्यांचा काळ निश्चित करता आलेला नाही.चिनी प्रवासी इत्सिंग यांनी वाग्भटांचा उल्लेख केला आहे.त्यावरून थोरल्या वाग्भटांचा काळ इ.स. ७ व्या शतकाआधीचा असावा असे एक.एफ.आर्. हाॅर्नले यांचे मत आहे.त्याच्यांच मते धाकट्या वाग्भटांचा काळ इ.स.आठवे व नववे शतक असा अनिश्चित आहे.धाकटे वाग्भट रसायन,रसकुपी,व कायाकल्प
याकरिता प्रसिद्ध होते.त्यांच्या गुरूचे अवलोकितेश्र्वर होते व ते बौध्द धर्ममताचे होते.एका आख्यायिकेनुसार इजिप्तच्या राजावर उपचार करण्यासाठी गेले असता त्यांचे तिकडेच निधन झाले.
अष्टांग संग्रह व अष्टांग हृदय संहिता हे आयुर्वेदीय ग्रंथ दोन व्यक्तींनी लिहिले असावेत,
असे हाॅर्नले व ज्योतिष चंद्र सरस्वती यांचे मत आहे.( म्हणजे पहिला ग्रंथ आजोबांनी व दुसरा नातवाने लिहीला असावा.) तर गणनाथ सेन व पंडीत यादवजी त्रिकमजी आचार्य यांच्या मतानुसार या ग्रंथांचे स्वरूप, भाषाशैली व रचना पाहता दोन्ही ग्रंथ एकाच व्यक्तीने ( धाकट्या वाग्भटांनी ) लिहीले असावेत.
अष्टांग संग्रहाच्या शेवटी लेखकाने वाग्भटांचा पुत्र सिंहगुप्त व‌ सिंहगुप्तांचा पुत्र वाग्भट असा उल्लेख केला आहे.तसेच आपण सिंध देशाचे राहणारे आहोत असेही म्हटले आहे.या ग्रंथांची रचना चरक व सुश्रुत यांच्या ग्रंथांसारखी असून तो गद्यपद्यमय आहे.ग्रंथांत चरक व सुश्रुत यांचे आधार नावनिशीवार दिलेले आहेत.या ग्रंथाला ‘ बृहत्/ वृध्द वाग्भट ‘ असेही म्हणतात व तो इ.स.आठव्या शतकाआधी लिहीलेल्या असावा.अष्टांसंग्रहाचे सार सूत्ररूपाने अष्टांगहृदयसंहिता या ग्रंथात आलेले दिसते.यामध्ये वैद्यकशास्त्राचे श्लोकबध्द विवेचन दिलेले असून शस्त्रक्रियेविषयी विस्तृत विवेचन केले आहे.या ग्रंथाला ‘ बाग्भट ‘ वा ‘लघुवाग्भट ‘ असेही संबोधतात.हा ग्रंथ इ.स.आठव्या शतकानंतरचा असावा.अकू, नाडी परीक्षा व रसायन क्रिया यांचा यात उल्लेख नाही.आयुर्वेदीय ग्रंथामध्ये यांवर सर्वाधिक टिकाग्रंथ लिहीले आहेत.

* भास्कराचार्य * द्वितीय *


भास्कराचार्य द्वितीय हे एक महान भारतीय गणितज्ञ होते.त्यांच्या वडिलांचे नाव ‘ महेश भट्ट ‘ होते.
ते एक ब्राह्मण होते.ते देखील एक गणितज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी होते.ज्यांनी आपले ज्ञान आपल्या मुलाला दिले.आर्य मधील एका श्लोकात भास्कराचार्य यांनी त्यांच्या जन्माचा तपशील दिला आहे.त्यानुसार त्यांचा जन्म १११४ मध्ये भारतातील महाराष्ट्र या राज्यातील खानदेशातील चाळीसगाव मधील पाटण गावी भास्कराचार्यांचा जन्म झाला.भास्कराचार्य यांच्या लीलावती या पुस्तकाचे नाव त्यांच्या मुलीच्या नावावरून ठेवले गेले आहे.असे मानले जाते.
इसवी सन पाचशे ते बाराशे हा काळ भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांचा सुवर्णकाळ होता असे सांगितले जाते.या सुवर्णकाळात एक भारतीय शास्त्रज्ञ जन्माला आले.ज्यांनी खगोलशास्त्रज्ञ आणि गणिताच्या संकल्पनेत मोठे योगदान दिले.ते दुसरे- तिसरे कोणी नसून भास्कराचार्य होते.भास्कराचार्यांनी ग्रहांची स्थिती, ग्रहांची घटना आणि विश्वविज्ञान यावरील खगोल निष्कर्ष त्यांच्या सिध्दांत – शिरोमणी या शीर्षकाच्या ग्रंथांत लिहीले आहे.

* भास्कराचार्य यांची कारकीर्द *

आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भास्कराचार्य स्वतः एक गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी बनले.ते प्राचीन भारतातील अग्रगण्य गणित केंद्र असलेल्या उज्जैन येथील खगोलशास्त्रीय वेधशाळेचे प्रमुख बनले.हे केंद्र त्यावेळीच गणितीय खगोलशास्त्राची प्रसिद्ध शाळा होती. भास्कराचार्य यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये गणितात महत्वपूर्ण योगदान दिलं होतं.एकाच क्षेत्रफळाची दोन वेगवेगळ्या प्रकारे गणना करून आणि त्यानंतर a2+b2=c2 अटी रद्द करून पायथागोरियन प्रमेयाचा पुरावा दिल्याचे श्रेय भास्कराचार्य यांना जाते.
सिध्दांत शिरोमणी ( ११५०) व करण कुतूहल ( ११७३ ) त्यांचे महत्वाचे ग्रंथ असून सिध्दांत शिरोमणीवर त्यांनीच वासना भाष्य हा टिकाग्रंथ लिहीला होता.याशिवाय भास्करविवाहपटल हा छोटा तसेच बीजोपनयन हा ५९ श्लोकांचा ग्रंथ हेही त्यांनी लिहिले असावेत.सर्वतोभद्र यंत्र हे ज्योतिषशास्त्रीय उपकरणांचे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.त्यांच्या ग्रंथांची फार्सी, इंग्रजी,मराठी, गुजराती,कन्नड,तमिळ,इ.भाषांत भाषांतरे झाली आहेत.
सन १५८७ मध्ये अबुल फैजी यांनी लीलावतींचे अरबी भाषेत भाषांतर केले तर अत्ताउल्ला यांनी सन १६३४ मध्ये बीजगणिताचे फार्सीत भाषांतर केले.सन १८१६ मध्ये जाॅन टेलर यांनी लीलावतींचे इंग्रजीत भाषांतर केले.तसेच १८१७ मध्ये हेन्री थाॅमस कोलब्रुक यांनी लीलावती आणि बीजगणित यांची इंग्रजी भाषांतरे प्रसिद्ध केली.
भारताने १९७९ आणि १९८१ मध्ये अवकाशात सोडलेल्या उपग्रहांना भास्कर -१ आणि भास्कर-२ ही नावे भास्कराचार्यांच्या सन्मानार्थ दिली आहेत.
भास्कराचार्यांच्या ग्रंथांमध्ये कलनशास्र, त्रिकोणमिती, वर्गसमीकरण वगैरे सारखे किचकट विषय सुध्दा त्यांनी हाताळले आहेत.
पृथ्वी ही गोल असून अंतरिक्षात स्थिर आहे.आणि तिच्या भोवती सूर्य व इतर ग्रह फिरतात.असे त्यांचे मत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top