१९७० मध्ये प्लास्टिकचा आपल्या जीवनात प्रवेश झाला.आणि पृथ्वीचा विनाशास सुरुवात झाली.आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला.
कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक, जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणारे तेल प्रथम शुध्द करून घ्याव्यात त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात.त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लास्टिकची निर्मिती होते.
प्लास्टिकचा वाढता वापर
शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘ प्लास्टिक ‘ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे ऱ्हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही त्यामुळे प्रदूषण होते.परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी,ही समस्या जगभर चर्चिली जात आहे.प्लास्टिक उद्योगातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे.तरीही केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे.म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरेल.
प्लास्टिक प्रदूषणामुळे आपल्या पर्यावरणाला खूप वेगाने हानी पोहोचते आहे.प्लास्टिक पिशव्या,भांडी आणि फर्निचरच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिक कचऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
यामुळे प्लास्टिक प्रदूषणासारखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
भारतात प्लास्टिकची बाजारपेठ दरवर्षाला ५० टक्क्याने वाढत आहे.तरीही जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातील प्लास्टिकचा वापर नगण्य आहे.एकट्या अमेरिकेत प्लास्टिकचा वापर दरडोई १०० किलो ग्रॅम आहे.जगात हे प्रमाण दरडोई ३५ किलो.आहे. भारतात हे प्रमाण ११ किलो आहे.येत्या काही वर्षांत भारतातील प्लास्टिकचा वापर दुप्पट होण्याची शक्यता आहे.२०००ते २००५ या पाच वर्षांत प्लास्टिक निर्मितीचा वेग हा चक्रवाढ रितीने आठ टक्के वाढला.प्लास्टिकचे उत्पादन ८२७० किलो टनरून ११ हजार १६७ टनावर गेले.त्यातून आपल्या देशाला दरवर्षी ६९०० कोटी रूपयांचा महसूल मिळाला होता.आजच्या घडीला या उद्योगात ४० लाखांपेक्षा जास्त लोक काम करत असतील.एवढा पसारा वाढला आहे.कच्चे प्लास्टिक तयार करणे नंतर पक्के प्लास्टिक तयार करणे त्यांचे विविध प्रकार करणे.आणि घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी पुरवठा करणे अशी असंख्य कामे या उद्योगात सुरू आहेत.मूळ प्लास्टिक बनवणारे जवळपास दहा मोठे ब्रॅण्ड देशात असून त्यांच्यात रिलायन्स, गेलं,ओपेल हल्दिया,गाऊ, सुप्रीम,आय ओसील, बीएएस एफ आदी बड्या नावाचा समावेश आहे.प्लास्टिक उद्योगातील अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, इटली, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, सिंगापूर,सौदी,चीन, आणि हॉंगकॉंग,या दहा प्रमुख देशांसह भारतही अग्रेसर आहे. २००८ साली आपला वाटा १.६ टक्के होता.२०१२ साली तो ३.२ टक्क्यांवर पोहोचला.सध्या तो ५ टक्क्यांच्या आसपास आहे.( पुढे ही जाऊ शकतो.)
संपूर्ण देशात प्लास्टिक उद्योगावर प्रक्रिया करणारे थोडे थोडके नव्हे तर तब्बल ५५ हजार युनिट किंवा कारखाने आहेत.मुंबई आणि परिसरात १५०० युनिट आहेत.मुंबईत येणारे प्लास्टिक हे कोणत्याही बाहेरच्या राज्यातून येत नाही.तर मुंबई आणि परिसरातच प्लास्टिकची निर्मिती होते.मागणी वाढत असल्याने प्लास्टिक उद्योग दरवर्षी ५० टक्क्यांनी वाढत आहे.अन्न उत्पादन असो की वाहन निर्मिती प्रत्येक क्षेत्राला प्लास्टिक हवे आहे.
* प्लास्टिक प्रदूषण *
१) प्लास्टिक प्रदूषण म्हणजे आपल्या वातावरणात प्लास्टिक कचरा पसरणे होय.
२) तलाव, नद्या,गटारे, आणि जमिनीवर प्लास्टिकचा कचरा साचल्यामुळे प्लास्टिक प्रदूषण होते.
३) प्लास्टिक तयार करण्यासाठी वापरली जाणारे संयुगे पूर्णपणे
४) प्लास्टिक प्रदूषणामुळे आपली परिसंस्था झपाट्याने दूषित होत आहे.
५) प्लास्टिक कचरा साचल्यामुळे माती उत्तरोत्तर नापीक होत आहे.
६) प्लास्टिक कचरा गळतीमुळे हवा,जमीन, आणि पाण्यात दूषितता पसरते.
७) प्लास्टिकच्या अतिवापरामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.प्लास्टिकमध्ये पॅक
केलेले खाद्यपदार्थ आणि पेये पिल्याने कर्करोगासह आपत्तीजनक आजार होऊ शकतात.
८) प्लास्टिक प्रदूषणामुळे निर्माण होणारा धोका आता केवळ एका देशाला नाही तर संपूर्ण जगाला
आहे.
* प्लास्टिक प्रदूषणाचे परिणाम *
प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे साऱ्या जगासमोर एक आव्हानात्मक काम आहे.जेव्हा प्लास्टिक कचरा मृदा ( soil ) किंवा पाण्याच्या स्रोतांपर्यत ( water sources ) पोहचतो.तेव्हा ती एक गंभीर समस्या बनते.लाकूड आणि कागदाप्रमाणे आपण ते जाळून नष्ट करू शकत नाही.कारण प्लास्टिक जाळल्यामुळे त्यातून अनेक हानिकारक वायू तयार होतात,जे पृथ्वीच्या वातावरणासाठी आणि जीवनासाठी अत्यंत हानिकारक असतात.यामुळे प्लास्टिक हवा, पाणी, आणि जमीन या तीनही प्रकारचे प्रदूषण होते.
* १) प्लास्टिक प्रदूषणाचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम *
प्लास्टिक कचऱ्यामुळे नद्या, तलाव आणि यांसारखे जलस्रोत दूषित होतात.हे प्लास्टिक कोणत्याही स्वरूपात समुद्रात किंवा नदीत पोहोचले तर ते विषारी रसायन पाण्यात सोडते.आणि ते प्रदूषित करते.हे पाणी आपल्या वापरासाठी आपल्यापर्यंत पोहचवले जाते.परंतु त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
* २) प्लास्टिक प्रदूषणाचा पर्यावरणावर परिणाम *
गाडल्यानंतरही प्लास्टिक हजारो वर्षे जमिनीतच रहाते. पाणी आणि हवा त्याठिकाणी पोहोचू शकत नाही.परिणामी जीवन तिथेच संपुष्टात येते.यामुळे जमिनीची सुपीक क्षमता संपुष्टात येते.
प्लास्टिक मधून बाहेर पडलेले विषारी पदार्थ जमिनीत मुरतात.यामुळे भूजल प्रदूषित होते.बहुसंख्य प्लास्टिकच्या वस्तू कचऱ्यात जाळून टाका.सामान्यत: प्लास्टिक जाळल्यावर ते नष्ट होते.असे मानले जाते.
प्लास्टिक जाळल्यावर विषारी वायू हवेत सोडले जातात.त्यामुळे प्रदूषण होते.या धुरामुळे मानवाला गंभीर आजार होऊ शकतात.
* ३) प्लास्टिक प्रदूषणाचे सागरी/ जलीय/ प्राण्यांवर होणारा परिणाम *
पाणी प्लास्टिक पिशव्या आणि इतर प्लास्टिक उत्पादने समुद्र,महासागर आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून येतात.अन्नाऐवजी हे प्राणी प्लास्टिक खातात.त्यामुळे मासे,कासव, आणि इतर
सागरी जीव आजारी पडतात.दरवर्षी प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे यांतील अनेक जलचरआंचआ मृत्यू होतो.
सहसा, घरातील कचरा किंवा उरलेले अन्न पॉलिथिनच्या पिशवीत टाकले जाते.आणि कुठेही फेकले जाते.
त्यामुळे बाहेर फिरणारे प्राणी असे की,गाय,कुत्रे, शेळ्या आणि इतर प्राणी ते अन्न म्हणून खातात.परिणामी प्लास्टिक त्यांच्या पोटात जाते. परिणामी प्राणी गंभीर आजाराने मरतो.
* प्रतिबंधात्मक उपाय. *
प्लास्टिकचा वापर जरी सोयीस्कर असला तरी त्याचे बरेचसे दुष्परिणाम देखील आहेत
जसे की, प्लास्टिकमुळे मानवाच्या तसेच प्राण्यांच्या आरोग्याची हानी होते.त्यामुळे प्लास्टिकचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करावा.
यासाठी मोठमोठे मॉल, दुकानदार, हॉटेल्स, मोठमोठे कापड व्यावसायिक, यांनी सरकार, जनता, यांच्या सहकार्याने योग्य तो पर्याय शोधून प्रसार आणि प्रचार केला तर नक्कीच! थोड्या प्रमाणात प्लास्टिक विरोधातील वाटचालीस मदत होईल. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरण्याऐवजी स्टीलच्या किंवा तांब्याच्या बाटल्या, किंवा कापडी पिशवीमध्ये पाणी भरून ठेवले तर प्रवासात प्लास्टिक बाटल्या ऐवजी याचा वापर होईल.थंड पाण्यासोबत आरोग्य आणि बचतपण होऊ शकते.तसेच अनावश्यक आणि हानिकारक प्लास्टिक उत्पादने किंवा क्रियाकलपांसाठी सरकारी बंदी आणि निर्बंध अधिक कठोर करणे.
* दैनंदिन वापरातील प्लास्टिकला पर्याय *
कोको फूड बाऊल्स,बांबू टूथब्रश, बांबूचे बॉलपेन, न्यूजपेपर,फूड बॅग्ज, प्लास्टिक कुंड्याऐवजी नारळीच्या करवंटीपासून तयार केलेल्या कुंड्या, चटण्या ठेवण्यासाठी करवंटीचा वापर, रद्दीपासून तयार केलेली पेन्सिल, कडूलिंबाच्या झाडापासून तयार केलेले कंगवे आरोग्यास प्लास्टिक खूप घातक आहे. हे माहीत असूनही केवळ पर्याय नाही म्हणून, वापरणे हे कितपत योग्य आहे? पर्याय आपण निर्माण केले पाहिजेत! भाजीपाल्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरण्यापेक्षा कागदी पिशव्या वापराव्यात रोजची वर्तमानपत्रे रद्दीत देण्यापेक्षा त्यातून कागदी पिशव्या तयार कराव्यात.किराणा दुकानापासून तर दवाखान्यापर्यत या वापरता येतात.शिवाय पर्यावरणासही पूरक आहेत.
चहासाठी मातीचे किंवा स्टिलचे कप वापरावे.जुन्या प्रथांचा त्याग करण्याऐवजी ती आपली चांगली संस्कृती म्हणून स्वीकारावी.पाश्चिमात्य देशात धान्यापासूनच प्लेट व चमचे तयार केले जातात.जेवण झाल्यावर ती प्लेटच खाल्ली जाते.आपणही या गोष्टी आचरणात आणू शकू फक्त यासाठी इच्छाशक्ती हवी.
प्लास्टिक नष्ट करता येत नाही.पण आहे ते पुन्हा वापरता येतं ही प्लास्टिकची जमेची
बाजू आहे.यासाठी सध्या प्लास्टिकला पर्याय शोधले जात आहेत.व्हिएतनामच्या एका तरूणाने एक नवीन पर्याय शोधला आहे.हा पर्याय इको- फ्रेंडली तर आहेच पण माणसाच्या आरोग्यासाठी पण चांगला आहे.
आपण रोज प्लास्टिकच्या ज्या वस्तू वापरतो.त्यात प्लास्टिक ‘ स्ट्रॉ ‘ चा पण समावेश होतो.जागतिक दर्जावर विचार करायचा झाला तर एकट्या अमेरिकेत ५० कोटींपेक्षा ( जास्त ) स्ट्रॉ दररोज वापरले जात असतील.जगभरतल्या एकूण ८३० कोटी स्ट्रॉ समुद्रात जाऊन पडतात.आणि समुद्र प्रदूषित करतात.
व्हिएतनाममध्ये ‘ लेपिरोनिया आर्टिकुलाटा ‘ प्रकारातील गवत मिळत स्थानिक भाषेत त्याला ‘ को बांग’ म्हणतात.या गवताचा आतील भाग नैसर्गिकरीत्या पोकळ असतो.या गवतापासून स्ट्रॉ तयार करण्यासाठी आधी गवत स्वच्छ केलं जातं.त्यानंतर त्यांचे २० सेंटीमीटर लांब काप केले जातात.
त्यांना योग्य आकार दिला जातो.आणि आतली पोकळ बाजू स्वच्छ केली जाते.अशाप्रकारे दोन प्रकारचे स्ट्रॉ तयार केले जातात.एक ओल्या गवताचं आणि दुसरं कोरड्या
कोरड्या प्रकारातील स्ट्रॉ २ दिवस वळवून भाजले जातात.जवळजवळ ६ महिन्यांच्या काळात हे स्ट्रॉ वापरता येतात ओल्या गवताचे स्ट्रॉ २ आठवडे वापरता येतात.
प्लास्टिकच्या बाटल्यांना पर्याय – स्टिल, तांब्याच्या आणि बांबूपासून तयार झालेल्या बाटल्यांचा वापर करू शकतो.
आपण थोडं भूतकाळात जाऊ या! पोळ्या, भाकरी, ठेवायला बांबूच्या टोपल्या वापरायचो कांदे,बटाटे, लसूण, भाजीपाला,ठेवण्यास सुध्दा यांचा वापर करायचो.यामुळे वस्तू खराब होत नसे धान्य साफ करावयाचे सुपंथ,फुले आणावयाची परडी हे सुद्धा बांबूपासून यातून सुध्दा अनेकांना रोजगार मिळत होता.आता पण विचार करू शकतो.नाही का?
गेल्या काही दशकांत प्लास्टिक प्रदूषणाची पातळी खूप वेगाने वाढली आहे, जी चिंतेची बाब आहे.आपल्याकडून प्लास्टिकचा वाढता वापर थांबवूनच या भयानक समस्येवर मात करता येईल.यासाठी जर सरकारने प्लास्टिक निर्मितीवरच जर बंदी घातली तर?ज्या प्लास्टिकमुळे पूर्ण जगाला वेठीस धरले आहे.फक्त जे अत्यावश्यक आहे.त्यांचेच उत्पादन सुरू ठेवावयास हवे.नाही का? आपण पण एक जबाबदार नागरिक म्हणून प्लास्टिकचा वापर कमी करून प्लास्टिक रूपी महाभयंकर राक्षसापासून
पृथ्वीला वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो.