मकरसंक्रांत

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. हा सण तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
भोगीच्या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात.तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.भोगी वर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते.
यावेळी मटार ( हिरवे वाटाणे ) गाजर,वांगी,तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते.त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात.तीळ लावून बाजरीची भाकरी करतात.ती लोण्यासह खातात.विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.
बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत.थंडीच्या काळात शरीराला उष्णता
मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात समावेश केला जातो.
दक्षिण भारतात विशेषतः भोगी पंडीगायी नावाने हा दिवस साजरा केला जातो.तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात विविध नावांनी साजरा केला जातो.मत्तू, पोंगल,कआन्नूम पोंगल अशी नावे आहेत.
भारत हा कृषीप्रधान देश आहे व त्यामुळे भारत देशात कृषी व्यवस्था व त्यांच्याशी निगडित अनेक सण- समारंभ साजरे केले जातात.त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात.हरभरे,ऊस,बोरे, गव्हाच्या ओंब्या,तीळ अशा गोष्टी सुगडात ( मातीचे लहान भांडे ) भरून त्या देवाला अर्पण करतात.
सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो.
तिळगूळ घ्या गोड गोड बोला, यामागील शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत.आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ आणि लाडू बनवतात.आणि खातात.शिवाय या सणानिमित्ताने कटू आठवणींना विसरून गोडवा भरण्याचा प्रयत्न केला जातो.

https://i.pinimg.com/originals/5d/a6/2a/5da62aca413c947db5ff42b9514bee3b.jpg

महत्त्व
दरवर्षी मकरसंक्रांती जानेवारी महिन्यात साजरी केली जाते.हा सण हिंदू धार्मिक सूर्यदेव सूर्याला समप्रित आहे.सूर्याचे हे महत्त्व वैदिक ग्रंथांमध्ये आढळते.विशेषत: गायत्री मंत्र, हिंदू धर्माचे पवित्र स्तोत्र ऋग्वेद नावाच्या ग्रंथात आढळते.मकरसंक्रांती हिंदू देव विष्णू, कल्की, यांच्या अंतिम अवतारांच्या जन्म आणि आगमनाशी देखील संबंधित आहे.
मकरसंक्रांती ही आध्यात्मिक साधनेसाठी महत्वाची मानली जाते.आणि त्यानुसार लोक नद्यांमध्ये विशेषतः गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, आणि कावेरी मध्ये पवित्र स्नान करतात.असे मानले जाते,की स्नान केल्याने पुण्य मिळते किंवा मागील पापांची मुक्तता होते.ते सूर्याला प्रार्थना करतात आणि त्यांच्या यशासाठी आणि समृध्दीसाठी धन्यवाद देतात.
वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्याचे उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरूवात होते.
थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते.भारत हा कृषीप्रधान देश आहे.येथील सण- उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे.मकरसंक्रांती अशा काळात येते.
जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक,ऊस,मका, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात.शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते.म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते.
मकरसंक्रांत इतर राज्यात कोणत्या नावाने ओळखली जाते.

१) केरळ – मकरसंक्रांती
२) आसाम- माघबिहू
३) हिमाचल प्रदेश – माघी साजी
४) पंजाब – माघी संग्रांद
५) जम्मू – माघी संग्रांद
६) हरियाणा – सक्रात
७) राजस्थान – सकरत
८) मध्य भारतात – सुकरात,पोंगल
९) आंध्रप्रदेश – आदल्या दिवशी भोगी, पंडगाई दुसऱ्या दिवशी पेड्डा पांडुगा,नंतर कनुमा पांडुगा आणि मुक्कानुमा या दिवशी श्राद्ध देखील करतात.पूर्वाजांना पारंपरिक अन्न अर्पणाचा विधी
१०) कर्नाटक – सुगी
११) पश्चिम बंगाल – या दिवशी रंगीबेरंगी पतंग उडवतात पौष संस्कृती म्हणतात.
१२) गुजरात – आंतरराष्ट्रीय पतंग बाजी महोत्सवासाठी प्रसिद्ध
१३) बिहार – खिचडी नावाने ओळखले जाते.
१४) उत्तर प्रदेश – या दिवसाला ‘ दानाचे पर्व ‘ म्हणतात.अंघोळीनंतर दान करण्याची परंपरा आहे.
१५) राजस्थान – या दिवशी अनेक मुली आपल्या सासूंना मिठाई,फळ, देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात.त्याखेरीज तिथे वस्तूंना १४ च्या संख्येत दान करण्याचे वेगळे महत्व आहे.
१६) तामिळनाडू – पोंगल या नावाने ओळखले जाते.

काळे कपडे का घालतात – मकरसंक्रांत हिवाळ्यातील संक्रांतीचा शेवटचा दिवस मानला जातो.तो हिवाळ्यात सर्वात थंड दिवस मानला जातो.काळ्या रंगाचा रंग धारण केल्याने इतर रंगापेक्षा वेगळी उष्णता अडकू शकते.त्यामुळे थंडीच्या दिवसात तुम्हाला उबदार ठेवता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top