मराठी माणसाला मराठीचे महत्त्व आहे का?

मी जर माझी भाषा विसरले.
आणि त्या भाषेतील गाणी विसरले.
तर माझ्या डोळ्यांचा आणि कानांचा उपयोग काय?
आणि माझ्या तोंडाचा तरी काय उपयोग?
मी जर माझ्या मातीचा वास विसरले,
आणि तिच्याशी इमान सोडलं.
तर माझ्या हातांचा उपयोग काय?
आणि, माझ्या जगण्याचा तरी काय उपयोग?
माझी भाषा बरोबर नाही, ती कुचकामी आहे.
ह्या मूर्ख कल्पनेवर मी विश्वास तरी कशी ठेवू.
जर माझ्या आईचे मरतांनाचे अखेरचे शब्द
हे माझ्या, माझ्या भाषेतील,
एव्हिन्कीतले असतील तर ….

अलीटेट नेमतुश्कीन,
( एव्हिन्की भाषेतील कवयित्री )

एव्हिन्की ही अशीच एक संपत चाललेली भाषा, ह्या
भाषेतील कवयित्री अलीटेट नेमतूश्कीन ह्यांनी ही
एक सुंदर कविता केली आहे.

* भाषा म्हणजे काय?
संवाद साधण्यासाठी वापरले जाणारे एकमेव
साधन म्हणजे ” भाषा” होय.
*भाषा कशाला म्हणतात?
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनात निर्माण होणारी भावना लिहून किंवा बोलून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवते तेव्हा त्याला भाषा म्हणतात.

* मराठी भाषेचा इतिहास *
मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्रीय या बोलीभाषेपासून झाला.असे बहुतांशी मानले जाते.पैठण( प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला.देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली.मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहीली जाते.इ.स.१२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळाचरित्र लिहिले.त्यानंतर इ.स.१२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली.महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली.संत एकनाथ यांनी या भाषेत भारूडे लिहीली.आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदी ग्रंथाची भर घातली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला.त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला.इ.स.१९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्य भाषेचा दर्जा दिला.इ.स.१९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकूट प्राप्त झाला.
राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला ‘ अक्षी ‘ शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे.अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख – ” चामुण्डराजे करवियले ” हा आद्य मराठी लेख समजला जात असे. ‘ अक्षी ‘ हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून दक्षिणेस ५ कि.मी.अंतरावर अलिबाग-मुरूड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख इ.स.१८८३ च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे.
* कालानुक्रमे मराठी भाषेत झालेले बदल *
मराठी भाषेचे वय हे साधारण १५०० वर्ष मानलं जातं.या काळात समाजजीवनातल्या बदलानुसार भाषा बदलत राहीली असं मानलं जातं.
* आद्यकाल *
ज्ञानेश्वरी ग्रंथाच्याही पूर्वीचा काळ म्हणजे इ.स.१२०० पूर्वचा काळ या काळातील विवेकसिंधू हा एकच ग्रंथ पाहायला मिळतो.या काळातील मराठी शब्दांचे तसेच वाक्यांचा उल्लेख ताम्रपट आणि शिलालेखात आढळतात.
* यादवकाल *
हा काळ इ.स.१२५० ते इ.स.१३५० असा आहे.देवगिरी यादवांचे महाराष्ट्रावर प्रेम होते.त्यामुळे मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला होता.अनेक कवी आणि लेखकांना राजाश्रय मिळाला होता.याच काळात वारकरी संप्रदाय उद्याला आला.तेव्हा विविध जातीत संतांची परंपरा जन्माला आली आणि त्या संतांनी विविध प्रकारांनी काव्यरचनेस सुरूवात केली.नामदेव शिंपी, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा,बंकामहार, सेना नाव्ही, कान्होपात्रा,आदी संतांनी भक्तीपर काव्य रचली.याच काळात महानुभाव पंथाची सुरूवात झाली.त्याच दरम्यान चक्रधर स्वामी,भावे व्यास , महिंद्रा व्यास,नागदेव, आणि महदंबा यांनी मराठी वाड्:मयात मोलाची भर टाकली.सांकेतिक लिपीची सुरूवात याच काळात झाल्याचेही सांगितले जात.
* बहामनी काळ *
यादवांच्या स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरू झाला.तेव्हाचा म्हणजे इ.स.१३५० ते १६०० असा हा काळ सरकारी भाषा,फारसी असल्याने स्थानिक लोक आणि भाषा याविषयी त्यांना काहीच कर्तव्य नव्हतं.तारीख सारखे फारसी शब्द याच काळात मराठीत आले.मात्र असं असलं तरीही मराठी भाषा समृद्ध होतच राहीली.नृसिंहसरस्वती, भानुदास,, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ,विष्णूदास,नामा,चोंभा, यांनी भक्तिपर काव्यांची मराठी वाड्:मयात भरच घातली‌.
* शिवाजी महाराजांचा काळ *
इ.स.१६०० ते १७०० या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांच आक्रमक थंडावल.शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले.याच काळात संत तुकाराम,समर्थ रामदास स्वामी, यांच्यामुळे लोकमान्यता मिळू लागली.मुक्तेश्वर, वामन पंडित, यांनीही मराठी काव्य विकसित केलं.त्याचप्रमाणे शिवकल्याण,रमावल्लभदास,मोरया गोसावी,संत महिपती यांनी चरित्र लिहून संत विजय,भक्ति विजय आदी ग्रंथाची मोलाची भर घातली.
* पेशवे काळ *
हा काळ इ.स.१७००ते १८१८ असा असून त्या काळात मोरोपंतांनी मराठी भाषेत अनेक ग्रंथरचना केल्या.श्रीधर या कवीने हरिविजय आणि पांडवप्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या कविता पोहोचवल्या.याच काळात श्रृंगार आणि वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळालं. त्यातूनच लावणी आणि पोवाडा हे नवीन वाड्:मय प्रकार मराठीत निर्माण झाले.तसेच या काळात बखर लेखनाची सुरुवात झाली.निरंजन माधव, कृष्ण द्यार्णव, रामजोशी प्रभाकर,होनाजी बाळा,सगनभाऊ हे या काळातील काही महत्त्वाचे कवी.
* इंग्रजी काळ *
इ.स.१७१८ पासून या कालखंडाला सुरूवात झाली.असून याच कालखंडात गद्य लेखनाला सुरुवात झाली.कथा, नियतकालिक, आणि गद्य साहित्य छापण्याची सुरुवात झाली.थोडक्यात मराठीचा उत्कर्ष व्हायला लागला.याच काळात मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकार्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम,,प्रश्न आदी चिन्हांची ओळख करून दिली.
* १९५० ते १९८० *
साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक -सामाजिक वातावरण बहरून आलं होतं.छबिलदास, दलितपॅंथर , नवं कम्युनिस्ट,अशा चळवळीचं वाताऊ एकीकडे फुलत होते.तर दुसरीकडे ॲकॅडमिक साहीत्याचा आणि समीक्षेचा उद्य होत होता.सरोजनी वैद्य,विजया राजाऊ,आदींचा वाड्:मयीन दबदबा होता.मध्यमवर्गीयांना रिझवण्याची जबाबदारी पु.ल.देशपांडेवर होती.त्यानंतर घाशीराम कोतवाल,सखाराम बाईंडर, गिधाड, ही सत्तरीच्या पूर्वार्धातली तर चि.त्र्य.खानोलकरांची मिस्ट्री, आणि दिलीप चित्रे,विलास सारंग,भाऊ पाध्ये, हे सुद्धा साठीच्या दशकातले ग.वा.बेहरेही याच काळात दणाणत होते.त्याच काळात स्त्री मुक्ती चळवळीचा नवीन प्रवाह उद्याला आला.त्यात छाया दातार,शारदा साठे,ज्योती म्हापसेकर अशा अनेकींनी वैचारिकतेला नव परिणाम दिलं.
* मराठी ज्ञात – अज्ञात *
१) मराठी ही इंडो – युरोपीय भाषा कुलातील एक भाषा आहे.
२) ‌भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे.
३) महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
४) मराठी ही जगातील पंधरावी आणि भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे.
५) मराठी भाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९ कोटी इतकी आहे.
६) मराठीच्या बोलीभाषा अहिराणी ( जळगाव,धुळे,बुलढाणा, मलकापूर,नाशिकचा (मालेगाव,सटाणा,कळवण,देवळा) हा भाग, मलकापूर, बर्हाणपूर , शहापूर)
७) इस्त्रायली मराठी
८) कोंकणी ( मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,गोवा,)
९) कोल्हापूरी ( कोल्हापूर)
१०) खान्देशी
११) चंदगडी ( कर्नाटक, महाराष्ट्र, सीमावर्ती, प्रदेश, चित्पावनी)
१२) झाडीबोली ( भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली,या जिल्ह्यांचा भूप्रदेश, झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो.तिथली ही भाषा )
१३) डांगी, तंजावर
१४) तावडी ( जामनेर, भुसावळ, जळगाव,बांदवर,रावेर,यावल)
१५) देहवाली ( भिल्ल, समाजात ही बोली आढळते.)
१६) नंद भाषा ( व्यापारी भाषा ही सांकेतिक भाषा)
१७) नागपुरी ( नागपूर, वर्धा, चंद्रपूर,आणू गडचिरोली चा काही भाग, भंडारा, गोंदिया,)
१८) बेळगावी ( बेळगावची बोलीभाषा, कन्नड,चंदगडी, कोल्हापूरी, कोंकणी, यांच्या मिश्रणातून तयार झालेली बोली
१९) भटक्या विमुक्त
२०) मराठवाडी ( महाराष्ट्र, कर्नाटक या सीमावर्ती भागातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बोली)
२१) मालवणी ( रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग)
२२) वर्हाडी ( बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा)

* मराठीची सद्यस्थिती *
स्वातंत्र्य प्राप्ती नंतर मराठी भाषा उच्चशिक्षणाचं माध्यम होऊ शकली नाही. तिथे आपली पहिली गाडी चुकली.आता तर प्राथमिक शिक्षणही इंग्रजीतून घेण्याचा प्रघात पडतोय. इंग्रजी शिकायला पाहीजे.पण निदान प्राथमिक शिक्षण आणि शक्यतोवर शालेय शिक्षणही मराठीतून व्हावं असं.थोड्याच लोकांना आवर्जून वाटतंय.असं दिसत.काही दिवसांनी इंग्रजी शिकवण्या प्रमाणे मराठीच्या शिकवण्या घेतल्या तर जाणार नाही ना? कारण खेड्यापाड्यात पण. इंग्रजी शाळांचा सुळसुळाट. झाला आहे.
इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन, चिनी, जपानी, आणि इतर अनेक भाषांमध्ये कोणत्याही क्षेत्रात उच्चशिक्षण घेणं शक्य आहे.त्या भाषांमध्ये तर्हेतर्हेचे आणि अनेक क्षेत्रांतले शब्दकोश आणि संदर्भकोश उपलब्ध असतात.तसच ह्या भाषांमध्ये इतर भाषांमधल्या सर्व क्षेत्रातल्या साहित्याचं, संशोधनाचं, विचारप्रणालींच निकडीन आणि तातडीनं भाषांतर होत असत.
मराठीचे शब्द कुठून आले,ह्याची मांडणी करणारे व्यापक व्युत्पत्ती कोश मराठीत नाहीत.इथे वापरलेले संदर्भ साहित्य कृ.पां.कुलकर्णी, चंद्रहास जोशी.श्रीपाद जोशी यांनी व्यक्तिगत अभ्यासातून तयार केलेले कोश आहेत.मराठी भाषेचा समग्र इतिहास आणि व्युत्पत्ती कोश तयार करण्यासाठी एक स्वतंत्र शासकीय संस्था असली तर त्यात सातत्यानं त्यात भर पडत राहील.
मराठीमध्ये वृध्दींगत होण्याची क्षमताही आहे.
पण ती काळाबरोबर चालू शकलेली नाही.ह्याच कारण म्हणजे मराठीचा वापर मर्यादित राहीला आहे.विविध क्षेत्रात मराठीचा जितका वापर होईल आणि मराठीत जितकं लिहीलं जाईल तितकी मराठी भाषा अधिकाधिक समृध्द होत जाईल.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी भाषिकांच्या मनातलं मराठीचं स्थान आपल्याला आपल्या भाषेबद्दल प्रेम आणि अभिमान वाटला मराठी लोकांची भाषे संबंधी अस्मिता जागी झाली आणि मराठीला प्रतिष्ठा प्राप्त झाली.तरच पुढच्या पिढीसाठी मराठी आकर्षक ठरू शकेल आणि पुढे विकसित होत राहील.
भारतासह माॅरिशस, इस्त्राईल, अमेरिका, न्युझीलंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका या देशांतही मातृभाषा मराठी असलेल्या लोकांची संवादाची भाषा मराठीच आहे.जगभरातले इतिहास, संस्कृत भाषा, प्राच्यविद्या, तज्ञांना ही मराठी भाषेची मोहीनी गेली.अनेक शतके पडलेली असल्यानेच जगभरातले भाषा आणि अन्य क्षेत्रातले संशोधक मराठी भाषेच्या संस्कृतीच्या संशोधनासाठी महाराष्ट्रात येतात.मराठीच्या या महान वैभवी इतिहासाची जपणूक आणि संवर्धन करण्यासाठीच दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी कुसूमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा होतो.
नुसतं ” मराठी वाचवा, मराठी वाचवा” असं म्हणत बसण्यात काही अर्थ नाही.त्यासाठी मराठी वातावरण महाराष्ट्रात निर्माण करावं.लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top