
* माती म्हणजे प्रत्येक सजीवातला दुवा, इथेच सुरूवात आणि इथेच शेवट!
* संपूर्ण जीवसृष्टीला अन्न धान्य देणारी जमीन ही आपली माता आहे.
पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ७ अरब लोकसंख्येला ९५ टक्कू अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती! माती पिकाच्या मुळाला आधार,अन्न, आणि पाणी देते.मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रिया द्वारे मातीच्या जडण घडणाचे काम करतात.म्हणून माती हे संजीव माध्यम आहे.
अन्नाची गरज भागवण्यासाठी उपजाऊ जमीन म्हणजेच मृदा महत्वाची ठरते.पृथ्वीवरची सगळीच माती किंवा जमिनीपासून खोलवर ची सगळी माती म्हणजे मृदा नव्हे.माती आणि मृदा हे शब्द भाषेमध्ये समानार्थी मानले जात असले तरी विज्ञानाच्या किंवा भूगोलाच्या संदर्भात ‘मृदा’ शब्दाला विशेष अर्थ आहे.
वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने जमिनीच्या पृष्ठभागालगत असलेला मातीचा थर महत्वाचा ठरतो.त्या थरांतील कणांचा आकार, पोषक द्रव्यांचे प्रमाण ओलावा इत्यादी गोष्टी तेथे वाढणाऱ्या वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी महत्वाच्या ठरतात.त्यावरच तेथील जमिनीच्या सुपीकपणा ठरतो.हा थर जमिनीमध्ये फार खोलवर नसतो.म्हणूनच पृष्ठभागालगतचा हा थर नष्ट होणार नाही.वाऱ्याने किंवा पावसाने त्याची धूप होणार याची काळजी घ्यावी लागते.पाण्याच्या अतिवापराने या थरातील क्षारांचे प्रमाण मर्यादेबाहेर वाढणे रासायनिक खतांच्या वापरामुळे या थरातील काही उपयुक्त सजीव नष्ट होण्याने मातीचा कस किंवा पोत बिघडणे यासारखे दुष्परिणाम होणार नाहीत.यासाठीही नेहमी जागरूक रहावे लागते. विटा,मातीची भांडी, यांच्या निर्मितीसाठी ही मातीचा वापर होतो.अफाट प्रमाणात विस्तारत चाललेली शहरे , असंख्य ठिकाणी होत असलेली इमारतींची बांधकामे आणि शहरांच्या आसपास असलेल्या वीटभट्ट्यांची संख्या पाहीली तरी केवळ वीट निर्मितीसाठी सुध्दा किती प्रचंड प्रमाणात मातीचा वापर होतो.याची जाणीव होते.केवळ पैशांच्या लोभासाठी सुपीक जमिनीतील मातीचा अशा कामांसाठी अतिवापर हा अविचारीपणा नव्हे का?
* मातीची आवश्यकता *
अन्नधान्याच्या ९५ टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात.जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते.पृथ्वीवर एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात ‘ मातीचा ‘ मोलाचा वाटा आहे.मातीमध्ये पाणी अडविण्याची साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे.
* मातीचे प्रकार *
* मातीचे ६ मुख्य गट आहेत – १) चिकणमाती २) वालुकामय, ३) सिल्टी माती, ४) पीट माती, ५) वन आणि पर्वतीय माती, ६) मूरिश लाईट ब्लॅक माती
* मृदा संधारण उपाय *
१) वृक्षारोपण – वृक्षांमुळे मृदांचे कण धरून ठेवले जातात. व त्यामुळे मृदेचे वाहत्या पाण्यापासून संरक्षण होते.
२) पिकांची फेरपालट करणे – वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून पालटून घेणे जेणेकरून जमिनीची धूप कमी होईल.
३) आच्छादने – पिक लहान अवस्थेत असतांना पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप आच्छादनामुळे कमी होते.तसेच कुरणांमुळे देखील मृदांवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
४) पायऱ्यांची शेती – डोंगराळ भागात जेथे उतारावर शेती जाते.त्या जमिनीवर पायऱ्यांची निर्मिती करून शेती केल्यास मृदेची धूप कमी होण्यास मदत होते.याला ‘ सोपान शेती ‘ असे देखील म्हणतात.
५) बांध घालणे – उतारावरच्या शेतीच्या भागात विशिष्ट उतारावर जर बांध घातले गेले तर पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाणारे मृदेचे थर बांधाजवळ साठवले जातील व मृदा सपाट होण्यास मदत होईल.तसेच बांधावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे.

*मातीची आवश्यकता
अन्नधान्याच्या ९५ टक्के गरजा माती द्वारे पूर्ण होतात.जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते.पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात ‘ ‘ ‘ मातीचा ‘ मोलाचा वाटा आहे.मातीमध्ये पाणी अडविण्याची साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे.
आरोग्यदायी अन्ननिर्मितीचा पाया
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहीलेला स्रोत आहे.या घटकांकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी ५ डिसेंबर हा ‘ जागतिक मृदा दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येतो.आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्ननिर्मितीचा पाया आहे.विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे.आधुनिक युगात मातीविना शेती यांसारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.माती कारखान्यात तयार होत नाही.माती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो.ऊन,वारा,पाऊस व पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर झाला.खडकांची झीज होऊन माती तयार झाली.लाखो वर्षे ही प्रक्रिया सुरू होती.साधारण १ सेंमी मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात.या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष प्राण्यांची विष्ठा कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात.सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते.अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते.जमिनीतील १० ते १५ सेंमी मातीचा थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा भाग असतो.
शेती मशागतीच्या चुकीच्या पध्दती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध,चराई वारा,जोराचा वारा इत्यादी कारणांमुळे जमिनीची धूप होते.हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधी पुरेसा ठरतो.जमिनीच्या धुपमुळे सुपीक माती वाहून जाते.सुपीक जमिनीबरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाळू ,खडकांचे बारी तुकडे वाहत जातात व सुपीक भागात पसरतात.यामुळे सुपीक जमीन नापीक होण्याची शक्यता असते.मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती साधली तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करू शकत नाही.हे वास्तव आहे.यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यकता आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे.भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. साहजिकच भारतीय समाज जीवनात शेतीला पर्यायाने शेतकऱ्यांना अनन्य साधारण महत्व आहे.
आज जगात भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो.आणि विशेष म्हणजे या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्या बाबत भारत स्वयंपूर्ण आहे.यावरून भारतीय संस्कृतीत शेतीचे महत्व विषद होते.परंतु असे असले तरीही दुसरीकडे मात्र पिकांच्या अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी भारतीय शेतीचे आरोग्य बिघडत चालले असल्याचे चित्र सामोरे ये आहे.सधन कृषी पध्दतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंधित वापरामुळे तसेच तदनुषंगिक कारणांमुळे जमिनीचा ( मातीचा ) कसं कमी होत आहे.त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती तपासणी आधारित खतांच्या परिणामकारक वापरास महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी शेतीबाबत पर्यायाने मातीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.
* मातीचे आरोग्य, ऱ्हास, आणि परिणाम *
भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.परंतु वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण,धरण,रस्ते इत्यादी विविध कारणांमुळे सुपीक जमीन जात असल्याने लागवडीलायक क्षेत्रात घट होत आहे.एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागवण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.
शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन आणि जमिनीची सुपीकता यांचे अनन्य साधारण आहे महत्त्व आहे.सेंद्रिय खतांच्या वापरायचा अभाव इत्यादींमुळे जमिनीचे गुणधर्म बदलत असून मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे.जमिनीची सुपीकता खालावत चाललेली असून तिचे आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे.सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील प्रमाण गांभीर्याने घटत चाललेले आहे.हवामान बदलाचा परिणाम म्हणून काही विपरीत बदल देखील जमिनीच्या गुणधर्मात होत असल्याचे दिसून येत आहे.परिणामी वापरण्यात येणाऱ्या किंमती निविष्ठांचा प्रभावी वापर होत नसून फक्त खर्चात वाढ होऊन शेतीच्या किफायतशीरपणा कमी होत आहे.
जमीन हा मर्यादित स्वरूपाचा नैसर्गिक स्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करून भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे.यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पध्दतीचे अवलंब करण्याची गरज आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड,माती परिक्षणानुसार खतांचा संतुलित वापर पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे.
* गंभीर परिणाम*
अमेरिकेत व भारतात झालेल्या संशोधनावरून असे आढळून आले की,धुपीमुळे दरसाल दर हेक्टरी सुमारे १२५ टन माती वाहून जाते.कधी कधी तर हे प्रमाण ३०० टनांपर्यंत गेल्याचे आढळून आले.अशा रितीने निसर्गाने केलेल्या शेकडो वर्षांच्या कार्याचा नाश अल्पकाळातच होतो.अशी अमर्यादित धूप होत राहील्यास वाढत्या लोकसंख्येच्या पोषणाच्या बाबत फार गंभीर समस्या निर्माण होतील.अशा धुपीमुळे अवर्षणग्रस्त भागांत अवर्षणाचे प्रमाण वाढू लागले आहे.नद्यानाल्यांची पात्रे गाळाने भरल्यामुळे व मोठमोठ्या पुरांमुळे आर्थिक व जीवित हानीचे प्रमाण वाढू लागते आहे.

* स्वस्थ माती स्वस्थ प्रकृती *
* लक्षात ठेवा – २०५० पर्यंत पृथ्वीवरील ९० टक्के मातीची झीज होऊ शकते.
जर आपण आताच कृती नाही केली तर !