संस्कृत भाषा आणि महत्व

संस्कृत ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन समृध्द आणि शास्त्रीय भाषा
मानली जाते.संस्कृत भाषा ही हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, इत्यादी विविध भाषांची जननी आहे.
संस्कृत भाषेला सुरभारती,देववाणी,देवीवाक,
देवभाषा,अमरभारती,गीर्वाणवाणी, इत्यादी अन्य नावे
आहेत.संस्कृतमध्ये लिहीलेले शिलालेख सर्वात प्राचीन
आहेत.पण काही कालांतराने संस्कृत भाषेचे महत्त्व
संपुष्टात आले व इसवी सन १२०० नंतर संस्कृत भाषा
प्रचलित झाली.
आपण ज्या भाषेला संस्कृत म्हणून ओळखतो.
तिच्यातील सर्व प्राचीन वाड्:मय ऋग्वेदातील मंत्रात
आढळते.त्या भाषेची ऐतिहासिक दृष्ट्या स्थूलमानाने तीन रूपे आढळतात.पहिले रूप वेदांच्या संहिता भागांत दिसणारे दुसरे उत्तर वैदिक म्हणजे बाम्हणे आरण्यके व उपनिषद हे ग्रंथ व वेदांग वाड्:मय यांत
आढळणारे व जिचे पाणिनीने वर्णन केले आहे.ती भाषा
आणि तिसरे पाणिनी नंतरच्या ग्रंथातून विशेषतः कालिदासादी कवींच्या काव्यात आढळणारे ‘संस्कृत’
शब्दांचा प्रयोग ती भाषा प्राकृतापासून म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या नेहमीच्या बोलीभाषेहून भिन्न
असल्याचे दर्शविण्याचा असावा.
संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन समृध्द,अभिजात आणि
शास्त्रीय भाषा मानली जाते.ही भाषा हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३
शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे.नेपाळमध्येही या
भाषेला अतिशय महत्व आहे.या भाषेत अनेक सुभाषिते आहेत.विख्यात व्याकरणतज्ञ ‘ पाणिनीने’ इ.स.पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले.
संस्कृत भाषेचा अतिप्राचीन नमुना ऋग्वेदातील मंत्रात आढळतो.हे मंत्र इ.स.पू‌सु.१५००-
१२०० ह्या काळात रचले गेले असावेत असे सर्वसाधारणपणे मानण्यात येते.ह्या भाषेचा त्यानंतरचा
सुमारे साडेतीन हजार वर्षांचा इतिहास निरनिराळ्या कालखंडातील उपलब्ध वाड्:मयामुळे ज्ञात आहे.उदा.
हल्ली मराठी भाषेत उपयोगात येत असलेला ‘ दूध ‘
हा शब्द क्रमाने दुग्ध ( संस्कृत ) व दुध्द ( प्राकृत ) ह्या
अवस्थांतून उत्क्रांत झाला आहे. हे वाड्: मयीन पुराव्यावरून कळते.परंतु संस्कृतपूर्व त्या शब्दांचे रूप
काय असावे हे जाणण्यास वाड्:मयीन पुरावा उपलब्ध
नाही.तौलनिक आणि ऐतिहासिक भाषाशास्त्रांच्या आधारे ते रूप धुध्त किंवा धुध्द असे असावे.असे अनुमान करावे लागते.
* संस्कृत भाषेची निर्मिती व्याप्ती आणि महत्व *
ज्या देववाणी संस्कृतने मानवाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवला त्या देववाणीलाच कृतघ्न मानव विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील सर्व पक्षीय राज्यकर्ते नष्ट करायला सरसावले आहेत.
प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मिरपासून लंकेपर्यत व गांधार पासून मगधपर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला,काशी,आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत.
‘ संस्कृत ‘ ही जगातील सर्वच भाषांची जननी आहे.संस्कृतचे महत्व आज पाश्चिमात्यांनाही समजले आहे.संस्कृत ही इंडोनेशियात लोकप्रिय आहे.
जपानमध्ये तिच्याविषयीचे आकर्षण आहे. जर्मनी अन्
अमेरिका येथेही तिच्या अभ्यासकांची संख्या वाढत आहे.
संस्कृतात जेवढी काव्य, नाटकं, आहेत.त्यापेक्षा
किती तरी अधिक प्रमाणात विविध शास्त्रांशी संबंधित ग्रंथसंपदा आहे.यासाठीच आज अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यास केला जातो.आपण
नेमके इथेच मागे पडतो.याचं कारण शालेय स्तरांवर
संस्कृत भाषा जशी ‘ प्रोजेक्ट ‘ केली जाते.त्यात दडलयं.शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात असं बिंबवलं
जातं की संस्कृत म्हणजे ‘ स्कोअरींग भाषा ‘ संस्कृतचा
अभ्यास म्हणजे व्याकरणाचा अभ्यास यामुळे तिचे
‘ ज्ञानभाषा ‘ हे स्वरूप विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही.
संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्रावणी पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमेला संस्कृत दिन
साजरा केला जातो. संस्कृत भाषा ही आपल्या संस्कृतीचा एक भाग असल्याने तिची जपणूक करणे
आपले कर्तव्य आहे.आचार विचार आणि उच्चार शुद्ध करणार्या या विद्वानांनी प्राचीन काळी संस्कृतमध्ये लिहीलेल्या ग्रंथसंपदेला आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
संस्कृत शिक्षकांची नेमणूक करून शालेय वयातच संस्कृत भाषा शिकविली गेल्यास मुलांमध्ये त्याची रूची निर्माण होईल.संस्कृत श्लोक,नाटके,कथा, बातमी,वाचन स्पर्धा शाळेमध्ये घेणे आवश्यक वाटते.
प्राथमिक शालेय जीवनातच संस्कृत विषय सक्तीचा केला गेला पाहिजे.ज्याला संस्कृत समजते तो आपोआप सुसंस्कृत होतो.
* संस्कृत दिवसाचा इतिहास*
जागतिक संस्कृत दिन भारतात प्रथम १९६९ मध्ये
साजरा करण्यात आला.संस्कृत भाषेविषयी जागरूकता पसरविण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुनरूज्जीवित करण्यासाठी उत्सव साजरा केला जातो.आपल्या वेदपुराणांचे लेखन संस्कृत भाषेतच करण्यात आले आहे.आजही धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात संस्कृतचा वापर करण्यात येतो.
* संस्कृत भाषेचा प्रशासकीय यंत्रणेमध्ये उपयोग *
पोलीस दल ( सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ), दूरदर्शन ( सत्य,शिवं,सुन्दरम् ), नौदल ( शं.नो.वरूण ),
आयुर्विमा संस्था ( योगक्षेमं वहाम्यहम् ), यांसारख्या विविध शासकीय, निमशासकीय,व अशासकीय प्रणालीची घोषवाक्ये ही संस्कृत भाषेतच आहेत.नेपाळ
देशाची राष्ट्रीय घोषवाक्य ” जननी जन्मभमिश्च स्वर्गादपि गरीयसी ” हे आहे. देशातील अनेक विद्यापीठांची घोषवाक्ये सुध्दा संस्कृत भाषेमध्येच आहेत.
* कर्नाटकातील मात्तूर या गावात चालतो संस्कृत
भाषेतून संवाद * ( शिमोगा )
जिल्ह्यातील मात्तूर गावची भाषा संस्कृत असून या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बेंगळुरू, म्हैसूर, आणि मंगळुरू,येथील विद्यापीठांमध्ये
संस्कृतचे अध्यापन करत आहेत.विशेष म्हणजे या गावात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहे.
द डॉ.हार्टझेल हे एक संस्कृत भाषेला वाहून घेतलेले स्पेन देशातील बास्क येथील ‘ सेंटर ऑन काॅग्निशन ब्रेन ॲंड लॅंग्वेज ‘ या विभागातील पदव्युत्तर संशोधक आहेत.
जगात सुमारे ३० दशलक्ष प्राचीन संस्कृत ग्रंथ आहेत.त्यापैकी ७ दशलक्ष भारतात आहेत.याचा अर्थ असा की,या भाषेत रोमन आणि ग्रीक भाषेपेक्षा जास्त
ग्रंथ आहेत.
काॅम्प्युटरच्या बेसिक लॅंग्वेजची निर्मिती देखील संस्कृत भाषेच्या सिद्धांतावर करण्यात आली आहे.
संस्कृत एक वैज्ञानिक भाषा आहे.
नासाने संस्कृतचा आपल्या प्रोग्रामिंग लॅंग्वेजसाठी वापर केला आहे.आजच्या काॅम्प्युटर युगात संस्कृतचे महत्व फार अधिक आहे.काॅम्प्युटर प्रोग्रामिंगच्या दृष्टीने ही सर्वोत्तम भाषा आहे. भारताबरोबर अनेक पाश्चात्त्य देशांत संस्कृत शिकवली
जाते.जगातील सतरा देशांमध्ये तांत्रिक ज्ञानासाठी संस्कृतच्या अभ्यासासाठी विद्यापीठे आहेत.विशेषत:
भारतीय श्री चक्रावर आधारित संरक्षण प्रणालीचा
युकेमध्ये अभ्यास केला जात आहे.


अभ्यासातून असे दिसून आले आहे की, संस्कृतच्या ध्वन्यात्मकतेचा शरीराच्या ऊर्जा बिंदूशी संबंध आहे.म्हणून संस्कृत शब्दांचे वाचन किंवा उच्चार
केल्याने ते उत्तेजित होतात.संपूर्ण शरीराची ऊर्जा वाढते
त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.मन शांत होते आणि प्राप्त होते.तणावापासून मुक्तता तसेच संस्कृत ही एकमेव भाषा आहे.जी भाषेतील सर्व मज्जातंतू शेवटचा वापर करते.शब्द उच्चारतांना सामान्य रक्त पुरवठा सुधारतो.आणि परिणामी मेंदूचे कार्य,अमेरिकन हिंदू युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार याचा परिणाम एकदंर आरोग्यावर होतो.
संस्कृतचा अभ्यास मानसिक क्रिया कलाप
आणि स्मरणशक्ती सुधारतो.जे विद्यार्थी या भाषेवर प्रभुत्व मिळवतात त्यांना गणित आणि इतर अचूक विज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतात आणि त्यांना जास्त गुण मिळतात.स्कूल ऑफ जेम्स जूनियर
लंडनमध्ये तिने आपल्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतचा अभ्यास अनिवार्य विषय म्हणून सुरू केला.त्यानंतर
तिचे विद्यार्थी चांगले अभ्यास करू लागले हे उदाहरण आयर्लंडमधील काही शाळांनी अनुसरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top